मानोरा : मंगरूळपीर तालुक्यातील जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्ष अश्विनीताई राम अवताडे या समाजामध्ये वावरत असताना अनेक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. त्यातलाच एक भाग म्हणून पालावर असणार्या मुलांकडे लक्ष गेले आणि त्यांना शिक्षणाबरोबर बाल संरक्षण गरजेचे असल्याने त्यांनी पालावरच शाळा भरवली व मुलांना लिहायला बोलायला अश्विनीताई राम अवताडे यांनी शिकविले.
गेल्या अनेक वर्षापासून पोट भरण्यासाठी आलेले अनेक लोक खेड्यापाड्यात जाऊन आपापल्या परीने जो हातात व्यवसाय पडेल ते करत असताना पोट भरण्याऐवजी दुसरे कुठलेही काम त्यांच्या हातून होत नसल्यामुळे त्यांची मुलं शिक्षणापासून कोसो दूर होती, परंतु अश्विनीताई अवताडे यांनी त्या लोकांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन पोट भरण्याबरोबर मुलांची बौद्धिक मशागत सुद्धा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पालावरच त्या निरागस बालकांची शाळा भरवली व त्यांना पाटीवर रेघोट्या मारून अक्षराचे वळण सुद्धा दिले. आजची मुलं चांगल्या प्रकारे लिहितात व बोलतात त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांचा उत्साह सुद्धा वाढला. पोट भरण्यासाठी या गावातून त्या गावात जाणारे व्यवसाय निमित्त फिरणार्या भटक्या विमुक्त जमातीतील मुली-मुलांना एका ठिकाणी शाळेत टाका व त्यांना संरक्षण देऊन त्यांची काळजी घ्या असे आवाहन अश्विनीताई औताडे यांनी केले. तसेच महिलांना आरोग्याचे मार्गदर्शन करून आपली आरोग्याची काळजी कशी घ्यायची या विषयी जनजागृती केली. त्यांच्या साठी वेळो वेळी आरोग्य शिबिर तिथे पालावर घेतले जातात या साठी आरोग्य विभाग मदत करतात. त्या सोबतच येथील महिलांना रोजगार विषयी मार्गदर्शन करतात. या मधील काही छोट्या मुलांची अॅडमिशन त्यांच्या आई-वडिलांनी तर पैसे भरून कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा केली आणि त्यांच्या साठी ते इथेच राहण्यासाठी तयार झाले. समाज सेवा अंगी भिडल्याने अश्विनीताई अवताडे यांनी सातत्य व परिश्रमाची जोड घालून यशस्वी लढा लढण्यासाठी तत्पर असतात.
*पालावरच्या मुला-मुलींचे शाळेत केले अॅडमिशन*
वाशिम मंगरूळपीरमध्ये गेले दोन ते तीन वर्षे झाले या मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अश्विनीताई काम करत आहेत. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तासनतास पालावर जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्या मुलांना शिकवुण व त्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करणे आणि याच माध्यमातून या वर्षी पालावरच्या १७ ते १८ मुला मुलींची अॅडमिशन शाळेत केली.
0 Comments