*वाशिम / सुरज अवचार :-*
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ अकोला संलग्नित
गीताई हनुमंकाईड ट्रस्ट पुणे, अंतर्गत कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा ता. मालेगाव जिल्हा वाशिम येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थिनीनी ग्रामीण जागरूकता व कृषी उद्योगिकपक्रम २०२३- २०२४ आंतर्गत कृषिकन्या कु. वैशाली जनार्दन काकडे, कु पुनम रामदास मालटे, कुं पुनम ज्ञानबावाघमारे, कु वर्षा अशोक जाधव, कु वैभवी सतिष उपाध्ये यांनी ८ ऑगस्ट रोजी काटा येथील शेतकऱ्यांना. कृषितज्ञ श्री हरिदास बनसोड यांच्या साहाय्याने गांडूळखत निर्मिती व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले
त्यामध्ये त्यांनी गांडूळ खत निर्मितीचे फायदे पिकांसाठी लागणारे मातीतील मुलभूत पोषकद्रव्ये, सेंद्रीय शेती लागवड पद्धती खत निर्मिती करताना घ्यावयाची काळजी व मातीची सुपीकता, रसायनमुक्त भाजीपाला पीक वाढ उत्पादनक्षमता इत्यादी बद्दल माहिती सांगण्यात आली.
तसेच गांडुळ खत तयार करताना कोणते महत्त्वाचे घटक घ्यावे
यामध्ये माती, गाईगुरांचे शेण ,स्वयंपाक घरातील सांडपाणी ,झाडाचा पालापाचोळा ( vermibed size
12Ft ,4ft,2ft) गांडुळाच्या विविध प्रजाती जसे की CEisenia foetida Lumbricus ru bellus) यांचा योग्य प्रमाणात उपयोग करून
(Fymmethod) (pit Method) (vermibed method)
गांडुळ खत निर्मिती व्यवस्थापन केल्यामूळे उत्पन्न वाढ कशी करता येईल आधुनिक सेंद्रीय शेती लागवड पद्धती, उत्पादनक्षमता वाढ अशा प्रकारची माहिती कृषीकन्या यांनी शेतकऱ्यांना दिली.
यावेळी कृषितज्ञ हरिदास बनसोड यांच्या थेट शेतात जाऊन शेतकरी,शिवाप्पा घंटे, गुलाबखाँ पठाण ,सपना बनसोड, रेखा बनसोड हे उपस्थित होते.
या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविदयालय आमखेडा येथील प्राचार्य डॉ एस .ए. काळे कार्यक्रम समन्वयक डॉ आर. एस. करंगामी वकार्यक्रम अधिकारी प्रा. एस .जाधव ,व एम.पी सुरूशे तसेच विषयतज्ञ प्रा एस. टी जाधव व प्रा.पी .जी नागपुरे व तसेच प्रा .शशिकांत वाकुडकर आणि जनसंपर्क अधिकारी प्रा. नंदकिशोर काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
0 Comments