Ticker

6/recent/ticker-posts

*सरपंच सौ कल्पना अवगण यांचे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण*


 *वाशीम प्रतिनीधी*

मंगरुळपीर तालुक्यातील मौजे प्रिंपी अवगण येथील सरपंच त्यांनी ब-याच वेळा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम येथील कार्यालयाकडे  गतीरोधक व स्ट्रीट लाईट बद्दल तोंडी व लेखी सुचना व विनंत्या केल्या होत्या परंतु त्याकडे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी याकडे लक्ष दिले नाही म्हणुन त्यांनी दि १७ आँगस्ट  २०२३ मंगळवार पासुन आमरण उपोषनाला बसले आहेत . जो पर्यत ठोस पाउले उचलली जात नाही रोडवरील गतीरोधक व लाईट चालु होत नाही तोपर्यत आमरण उपोषण सुरुच राहणार आहे. असे उपोषण कर्ते सरपंच सौ कल्पना अवगण यांनी सांगितले आहे . उपोषनाला बसणार याची प्रत मा , जिल्हा अधीकारी साहेब वाशिम , उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम ,मा ठाणेदार साहेब पोलिस स्टेशन वाशिम यांना दिले आहे तर आज गुरुवार हा आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे .

Post a Comment

0 Comments