Ticker

6/recent/ticker-posts

*वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो...प्रा अंजलीताई आंबेडकर*


मालेगाव तालुका सर्कल मेळाव्याला युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीने युवा वर्गात कमालीचा उत्साह.*


*वाशिम / सुरज अवचार :-* 

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वाशिम जिल्हा प्रभारी मा अरुंधतीताई सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तीन दिवशीय मालेगाव तालुका दौऱ्यात मेडशी , डोंगरकिनी , तिवळी , ब्राम्हणवडा, राजुरा, जाऊळका रेल्वे, राजाकीन्ही, पांगरी नवघरे, शिरपूर अश्या नऊ सर्कल  मधील अनुक्रमे मुंगळा, डोंगरकीनी, ढोरखेडा, डही, डव्हा, करंजी, जऊळका रेल्वे, अमानवाडी, शिरपूर  या गावात सर्कल आढावा सभा घेण्यात आल्या. मालेगाव दौऱ्याला युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थिमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये कमालीची ऊर्जा बघायला मिळाली. या दोऱ्याला युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा दि गजाला खान, प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे, जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले, जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतिताई इंगळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ, रिसोड मालेगाव विधानसभा प्रभारी परितोष इंगोले, कारंजा विधानसभा प्रभारी अभिजित राठोड, जिल्हा मार्गदर्शक नारायणराव मिटकरी,  जिल्हाप्रवक्ता संदीप सावळे, मो अकिल सय्यद,  जिल्हाउपाध्यक्ष प्रा रंगनाथ धांडे,  शिवचंद्र खंडारे, जिल्हा सचिव वसंतराव हिवराळे, उत्तमराव झगडे, प्रा हेलोडे सर, जि प सदस्या कल्पनाताई राऊत, माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख, मालेगाव ता अध्यक्ष सारनाथ अवचार, महासचिव राजु जमधाडे, उपाध्यक्ष कैलासराव ढाले, महिला आघाडी ता अध्यक्ष वंदनाताई गायकवाड, सुप्रियाताई सहस्त्रबुद्धे, युवा आघाडीचे नागसेन धांडे, यांच्यासह मालेगाव तालुक्यातील पदाधिकारी  उपस्थित होते. सर्कल मेळाव्याला मार्गदर्शन करतांना मा अंजलीताई यांनी वंचित बहुजन आघाडीची दिशा कशी असावी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काय केले पाहिजे, संघटन, पक्ष बांधणी, बुथ बांधणी यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायरान अतिक्रमण, गावातील घरासाठी केलेले अतिक्रमण, या करिता महाराष्ट्र विधानसभेवर भव्य जनाक्रोशी मोर्चा काढून महाराष्ट्रातील  गायरान धारकांना न्याय मिळवून दिला, धर्माच्या नावाने दंगली घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना औरंगजेब कबरीवर फुले वाहून प्रस्थावीत दंगली शांत केल्या, सर्व धर्म व महापुरुष यांच्यावर होणाऱ्या अभद्र टिपणींना आळा घालण्यासाठी मोहम्मद पैगंबर बिल आमदार कपिल पाटील यांच्या मार्फत विधान परिषदेमध्ये बिल आणले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावत वाढ करून त्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये याबाबत केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात ठोस भूमिका घेऊन बार्टी चा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा केला. शेतमजूर, वेठ बिगारी कामगार  इत्यादी सर्व सामान्यांच्या मुद्यावर महाराष्ट्रभर केलेल्या आंदोलनाची माहिती सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचावा असे आवाहन केले. 2024 या सालात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषद ग्राम पंचायत व इतर निवडणुका येणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागून आपला विजय निश्चित करण्यासाठी काम करावे अश्या सूचना दिल्या. महिलांनी वंचित बहुजन आघाडी सोबत काम करावे. या पक्षात महिलांना मानसन्मान मिळत असून महिलांची सुरक्षा वंचित बहुजन आघाडी मध्ये घेतली जाते. त्यामुळेच महिलांचा सहभाग वाढत आहे. महाराष्ट्रामधील सध्याची राजकीय परिस्थिती अनिश्चित असून इतर कोणत्याही पक्षावर सर्व सामन्याचा विश्वास राहिला नाही. फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष सर्व सामन्याचा विश्वासाचा पक्ष आहे हे नमूद केले.  सोबतच वाशिम जिल्हा प्रभारी मा अरुंधतीताई सिरसाट यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल अश्याप्रकारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत केली पाहिजे , आपआपसातील मतभेद विसरून नव्याने कामाला लागा असे प्रतिपादन केले.  गावागावात शाखा स्थापन करण्यात येऊन 2024 ची निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी तसेच सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची असुन जातीयवादी मानसिकता असलेले bjp सरकार उखडून फेका असे आवाहन केले. महिलांसाठी वंचित बहुजन आघाडी सुरक्षित पक्ष आहे हे सांगितले. मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी राजाकिन्ही मधील अमानवाडी गावातील मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन करतांना युवकांनी राजकीय पुढाकार घेऊन येणारी पिढी ही सक्षम कशी होईल यावर मार्गदर्शन केले. युवकांनी पुढे येऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढले पाहिजे तरच भविष्य काळ उज्वल राहील असे संबोधित केले. युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा यांच्या वाशिम दौऱ्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या युवा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना नवीन उभारी मिळाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्कल मेळाव्याला युवा नेतृत्व सुजातदादा आंबेडकर, डॉ गजाला खान, किरणताई गिर्हे, डॉ गजानन हुले, सोनाजी इंगळे, परितोष इंगोले, ज्योतिताई इंगळे, अनिल गरकळ, प्रा रंगनाथ धांडे, सारनाथ अवचार, वंदना गायकवाड, यांनी मार्गदर्शन केले. मालेगाव तालुक्यातील ऐकून नव सर्कल दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून हा उपक्रम वाशिम जिल्हाभर राबविण्यात येणार असे जिल्हा कमिटीच्या वतीने आश्वासन देण्यात आले आहे. मालेगाव तालुका सर्कल मेळाव्याचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष कैलास ढाले यांनी केले. सर्कल दौरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मालेगाव तालुका कमिटी, सर्कल अध्यक्ष अरुण गवई, आशिष इंगळे, प्रदीप मोरे, राहुल खिल्लारे, वामन वनखेडे, बबन पडघाण, गौतम तायडे यांनी परिश्रम घेतले. तीन दिवशीय मेळाव्याला मालेगाव तालुक्यातील सर्व सर्कल मध्ये भरपूर प्रमाणात उपस्थिती दाखवून वंचित बहुजन आघाडी भक्कमपणे उभी राहत असल्याचे चित्र दिसून आले.

Post a Comment

0 Comments