Ticker

6/recent/ticker-posts

*वंचित बहूजन आघाडीची विचारधारा घराघरात पोहचविणार - डॉ. माधव हिवाळे*


वाशीम - वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जेष्ठ नेते डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनात पक्षाची विचारधारा घराघरात पोहचवून वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. माधव हिवाळे यांनी दिली.

  गेल्या १० वर्षापासून सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. हिवाळे यांनी डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनात १ ऑगष्ट रोजी स्थानिक विश्रामगृहात झालेल्या बैठकीत वंचित बहूजन आघाडीत रितसर प्रवेश घेतला. यावेळी महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरुंधतीताई शिरसाट, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे, जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, बाळुभाऊ खंडारे, जेष्ठ नेते किसन साळुंखे, उपाध्यक्ष नितीन बनसोड, अजय सरकटे, गजानन सरकटे, कृउबास संचालक सुभाष राठोड, संदीप सावळे आदींची उपस्थिती होती. पक्षप्रवेशानंतर बोलतांना डॉ. हिवाळे म्हणाले की, जिल्हयात अनेक ग्रामपंचायतीमध्ये वंचितचे सरपंच व सदस्य निवडून आले असून या ग्रा.पं. वर वंचितची सत्ता आहे. तसेच जि.प. पं.स.मध्ये सुध्दा पक्षाने कार्यकर्त्यांना संधी देवून जनतेच्य सेवेसाठी त्यांना सत्तेत पाठविले आहे. आता आगामी २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात पक्षसंगठन मजबूत करण्यावर आपण भर देणार असून पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील वंचित व पिडीतांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही डॉ. हिवाळे यांनी दिली. डॉ. माधव हिवाळे हे सामाजीक कार्यात सक्रीय असून भिमसंग्राम सामाजीक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. शिवाय कोरोनामध्ये त्यांनी सॅनिटायझर व मास्क वाटप, रुग्णांना औषधीचे वाटप यासह रुग्णालयातील रुग्णांना मदत, असाध्य व दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम राबविले आहेत. यासह आर्यव्रत पॅरामेडीकल संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हयातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम देवून त्यांना कौशल्य विकासासह शासकीय सेवेत सामावून घेतले आहे हे येथे उल्लेखनिय आहे. या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments