Ticker

6/recent/ticker-posts

*दारुविक्री विरोधात महिलांची जउळका पोलिस स्टेशनमध्ये धडक*

 

" दारुविक्रेत्यावर कारवाई करा ! ठाणेदार यांना निवेदन" ! 


*मालेगांव / प्रतिनीधी सुरज अवचार 



 मालेगांव तालुक्यातील वरदरी बु. येथे सर्रासपणे दारु विक्री सुरु आहे . परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारु विक्रत्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी महिलांनी पोलिस ठाणे गाठुन गावात दारुबंदी करावी अशी मागणी करत महिलांनी व नागरिकांनी निवेदन दिले आहे . 

 मालेगांव तालुक्यातील जउळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरदरी बु . येथे अवैध दारु विक्री सुरु आहे . त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत व यामुळे गोरगरिब मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे दारुविक्रत्यांना पकडुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातुन केली आहे. निवेदनावर दारुबंदी महिला व नागरिकांच्या वतिने जउळका येथील ठाणेदार यांना निवेदन दिले आहे .

Post a Comment

0 Comments