वाशीम प्रतिनिधी
जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे परिणामी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नुसकानग्रस्त सोयाबीन पिकाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस वाशिम यांना दिले आहे यावर्षी वाशिम जिल्ह्यामध्ये उशिरा पाऊस आल्याने पेरणीची कामे उशिरा झाले होते तसेच मध्यंतरी पावसाने खंड दिल्याने सोयाबीन पिकावर मोठा परिणाम झाला आहे अशातच आता सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे या रोगामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या पिवळ्या मोझॅकमुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागातील शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनचे पिके पिवळे पडत असून सोयाबीनची पानगळ होत आहे मोझॅक ग्रस्त शेतातील सोयाबीन पिकाला फुले व शेंगा लागत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात देणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी वाशिम यवतमाळ मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पिवळा मोझॅक या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी भुवनेश्वरी एस यांना दिले आहे
0 Comments