Ticker

6/recent/ticker-posts

*सरल अ‍ॅपव्दारे डिजीटल होणारा भाजपा देशातील पहिला राष्ट्रीय पक्ष - शाम बढे*

वाशीम


भाजपा जिल्हाध्यक्ष शाम बढे व रेल्वे बोर्ड सदस्य धनराज गुट्टे यांचा वाशीम येथे सत्कार

वाशीम - भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाम बढे यांचा तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल धनराज गुट्टे यांचा शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी अकोला हिंगोली हायवेवरील डॉ. जयश्री गुट्टे यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा भटके विमुक्त महिला आघाडीच्या पश्विम विदर्भ संयोजीका डॉ. जयश्री गुट्टे यांनी केले होते. कार्यक्रमाला हिंगोली न.प. सभापती श्रीराम बांगर, भाजपा जिल्हा महामंत्री नागेश घोपे, सुधाकर गंगावणे, दिनकर गंगावणे, राजु सांगळे, सुरज चौधरी, तुकाराम घुगे, गजानन भेंडेकर, अनिल गंगावणे, छाया पवार, सौ. संगीता इंगोले, सौ. सोनाली गर्जे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. जयश्री गुट्टे, सौ. संगीता इंगोले, सौ. सोनाली गर्जे यांच्या हस्ते शाम बढे, धनराज गुट्टे व नागेश घोपे यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून बोलतांना डॉ. जयश्री गुट्टे बोलतांना म्हणाल्या की, राज्यातील समस्त वंजारी समाजाच्या विकासासाठी धनराज गुट्टे यांनी अ.भा. वंजारी युवा संघटना अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वत:ला वाहून घेतले असून रेल्वे बोर्ड सदस्य म्हणून त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. यासोबतच शाम बढे यांच्या रुपाने जिल्ह्याला कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष लाभले असून त्यांच्या नेतृत्वात जिल्हयात भाजपाचे संगठन मजबुत झाले आहे.

  आपल्या मार्गदर्शनातून शाम बढे यांनी भाजपाच्या वतीने निर्मित केलेल्या सरल अ‍ॅपबद्दल मााहीती दिली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आता नवा डिजिटल अवतार धारण केला असून रिपोर्टिंग अँड  एनालिसिस अर्थात सरल नावाचे अ‍ॅप हे पक्षांतर्गत संवाद आणि संवादाचे प्रमुख माध्यम बनले आहे. सरल अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल होणारा भाजप हा देशातील पहिला राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. सरल अ‍ॅपवर भाजपच्या तीन कोटींपेक्षा जास्त पदाधिकार्‍यांचा डेटा अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते बूथ स्तरापर्यंतचे पदाधिकारी आता केवळ एका क्लिकच्या अंतरावर असतील. हे अ‍ॅप कोणीही डाउनलोड करू शकते. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते बूथ स्तरापर्यंतच्या पदाधिकार्‍यांशी एका क्लिकवर संवाद साधता येईल. या अ‍ॅपव्दारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही पदाधिकार्‍याशी संपर्क साधू शकतो. भाजपाचे संगठन वाढविण्यासाठी व पक्षाला मजबूत करण्यासाठी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पक्षाची विचारधारा मानणार्‍या नागरीकांनी सरल अ‍ॅप डाऊनलोड करावे असे आवाहन शाम बढे यांनी शेवटी केले. वंजारी समाजाचे युवा नेतृत्व धनराज गुट्टे यांनी आपल्या सामाजीक आणि राजकीय कार्याची माहिती देवून आपल्या हक्क आणि अधिकारासाठी वंजारी समाजाने जागृत राहण्याचे आवाहन केले.

  कार्यक्रमाला निखिल सदावर्ते, अतिश काश्यप, विनोद आदमणे, सचिन राठोड, दत्ता केंद्रे, जया येळणे, उमा कळीनकर, दिपक वानखडे, विठ्ठल राऊत, वैभव भेंडेकर आदींसह भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments