प्रतिनिधी/ दिलीप अवगन पाटील :-
नागपूर ते मुंबई या महामार्गावर जवळका रेल्वे हे गाव आहे या गावला हायवे लाभल्याने २३ गावच्या ग्रामीण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ सुरूच असते म्हणून तर वरली मटका, गावठी दारू असे अवैध धंदे करणाऱ्यांचे पसंतीचे स्थान असल्याचे दिसून येत आहे.
जऊळका या गावात ठाणच मांडून बसले आहेत मात्र यांनी ठाण मांडले तरी कोणाच्या आशीर्वादाने असा प्रश्न जवळक्यातीलच नव्हे तर वाशिम जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत असून या वरली मटका, देशी दारूच्या व्यसनाधीन असणारे व्यक्तींचे मुलाबाळांचे भविष्य हे आजच अंधारात असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारची विदारक परिस्थिती समोर असताना सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाव्दारे त्यांचे विरोध कुठलीही ठोस पावले उचलुन कारवाई का केल्या जात नाही त्यामुळे पोलीस दादा मलिदा लाटण्याच्या वाटेवर तर नाही ना ? असा प्रश्न त्या ठिकाणी जवळका रेल्वे येथील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. या अवैध देशी दारूचे अड्डे वरली मटक्याचे अड्डे उध्वस्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे काही दिवसापूर्वी महिलांनी निवेदनने दिली तरी देखील पोलीस प्रशासन मात्र मलिदा लाटण्याच्या वाटेवर असल्याने या महिलांच्या आर्त हाकेकडे पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मात्र मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी या सर्व प्रकरणाकडे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे जनतेत सूर दिसून येत आहे.
0 Comments