*आगामी निडणुकीची पूर्व तयारी ; गवळीपुरा येथील शेकडो युवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश*
कारंजा (लाड) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद बैठक व पक्षप्रवेश कार्यक्रम दि. ११ सप्टेंबर रोजी गवळीपुरा येथे उत्साहात संपन्न झाली. दरम्यान गवळीपुरा येथील शेकडो युवकांनी जिल्हाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी संपूर्ण समाज जोडला गेला पाहिजे व पक्षाचे ध्येय घोरण जनमानसाला अवगत होऊन मा.अजितदादा पवार हे एक विकासात्मक विचारधारा आहे ही बाब प्रत्येकांच्या मनावर बिंबवल्या गेली पाहिजे या उद्देशाने गवळीपूरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफसेठ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली संवाद बैठक व इतरत्र विखुरलेल्या युवकांचा पक्ष प्रवेश समारंभ घेण्यात आला. पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आयोजित बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ सेठ पुंजानी हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, वहिद भाई, माजी गटनेते ॲड.फिरोज शेकुवाले, माजी न.प उपाध्यक्ष अनिस खान, शहराध्यक्ष अजय श्रीवास, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हुसैन बंदुकवाले, ॲड. मिलिंद खंडारे, जाकीर शेख, शहर कार्याध्यक्ष नदीम राज, एजाज खान, शहर उपाध्यक्ष चांद मुन्नीवाले, श्याम घोडेस्वार, रज्जाक फकीरावाले, योगेश चौधरी, प्रदीप राऊत, संजय कोकरे, तालुका सहसचिव शकील नौरंगाबादी, कासम भाई बंदुकवाले, कासम भाई मुन्नीवाले, जुम्माभाई बंदुकवाले, माजी न.प उपाध्यक्ष शकील शेख, फारूख अली, अकबर खान, सलीम प्यारेवाले, रहेमान नंदावाले, रज्जाक खेतीवाले,नासिर गारवे, रशीद निन्सूरवाले, ताजभाई ठेकेदार, सै. मुजाहिद आदिंसह कारंजा शहर व तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद शेख यांनी केले तर आभार आयोजक हुसैन भाई बंदुकवाले यांनी मानले.
0 Comments