Ticker

6/recent/ticker-posts

कळंबा महाली येथील ग्राम पंचायत कार्यालयाची दुरवस्था* *लोकप्रतिनिधी, कर्मचारी, व कामानिमित्त येणारे ग्रामस्थांची होते गैरसोय* *ग्रा.पं. इमारतीमध्ये दैनंदिन काम करणे बनले धोकादायक*

 वा


शिम :- तालुक्यातील वाशिम पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कळंबा महाली येथील ग्राम पंचायत  लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठी असून, येथील ग्रामपंचायत कार्यालय मोडकळीस आलेले आहे. या कार्यालयात लोकप्रतिनिधी, कर्मचारी, व कामानिमित्त येणारे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ग्रा.पं. इमारतीमध्ये दैनंदिन काम करणे धोकादायक बनले आहे.

वाशिम तालुक्यातील कळंबा महाली या गावाची जवळपास ५००० लोकसंख्येच्या १००० कुटुंब संख्या असलेल्या ग्रामपंचायत कळंबा महाली कार्यालयाची इमारत स्वतंत्र पूर्व काळातील असून, सद्यस्थितीत अतिशय जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहे. ग्रामपंचायत समोरील स्लॅब खचून पडलेला आहे. छताला तडे गेलेले आहेत, पावसाळ्यामध्ये कार्यालयात पाणी गळून फर्निचर व कार्यालयातील साहित्य ओले होतात. अशा इमारतीमध्ये दैनंदिन काम करणे धोकादायक बनले आहे. जिल्हा परिषद कळंबा महाली गण असून, पंचायत समिती सुपखेला व कळंबा महाली गण अंतर्गत दहा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ११ ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामपंचायत सभा घेणे, आपले सरकार सेवा केंद्र चालविणे, दैनंदिन कामकाजाकरिता जागा अपुरी, ग्रामविकास अधिकारी पद मंजूर असलेल्या गावांमध्ये सर्वसामान्य जनतेला एका छताखाली जन सुविधा केंद्र, महसूल, कृषी विद्युत मंडळ, बँक पर्यंत इतक्या ते ग्राम विकासासाठी निगडी सेवा मिळणे अपेक्षित आहे. म्हणून ग्रामपंचायत कळंबा महाली येथे नमो ११ सूत्रे कार्यालया अंतर्गत नमो ग्रामपंचायत सचिवालय इमारत मंजूर होऊन मिळावी, अशी मागणी ग्राम सदस्य व ग्रामपंचायत कार्यकारीनीची आहे. (का.प्र.)



*ग्रामपंचायत सचिवालय इमारत मंजूर होऊन मिळावी!*

११ ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामपंचायत सभा घेणे, आपले सरकार सेवा केंद्र चालविणे, दैनंदिन कामकाजाकरिता जागा अपुरी, ग्रामविकास अधिकारी पद मंजूर असलेल्या गावांमध्ये सर्वसामान्य जनतेला एका छताखाली जन सुविधा केंद्र, महसूल, कृषी विद्युत मंडळ, बँक पर्यंत इतक्या ते ग्राम विकासासाठी निगडी सेवा मिळणे अपेक्षित आहे. म्हणून ग्रामपंचायत कळंबा महाली येथे नमो ११ सूत्रे कार्यालया अंतर्गत नमो ग्रामपंचायत सचिवालय इमारत मंजूर होऊन मिळावी, अशी मागणी ग्राम सदस्य व ग्रामपंचायत कार्यकारीनीची आहे.


*प्रतिक्रिया*


ग्रामपंचायत कळंबा महाली येथे नमो ११ सुत्री कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत सचिवालय इमारत मंजूर होऊन ग्रामस्थांचे व प्रशासकीय कामकाजा संबधी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रशासनातफे करणार.

रेखाताई संजय महाले, सरपंचा,कळंबा. 

Post a Comment

0 Comments