वाशिम : पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्याची निर्मीती झाली आहे. मात्र, यामधील काही रस्त्यावर पुल निर्मीतीची आवश्यता होती. ही आवश्यकता लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील विविध रस्त्यावर २३ कोटींचे पुल बांधण्याच्या कामाला लवकरच मंजुरात देण्यात येणार आहे. अशी माहीती वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खा. भावनाताई गवळी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहीती देतांना खा. भावनाताई गवळी यांनी सांगीतले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही ग्रामीण भारतातील उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वाहतुकीसाठी एक योजना आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना डिसेंबर २००० मध्ये भारतातील संपर्क नसलेल्या गावांना रस्ते कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत सरकार अंतर्गत सुरू केली. शहरातील अर्थकारण गावांतून येणार्या कच्च्या मालावर अवलंबून आहे. त्यामुळेच ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’च्या माध्यमातून गावांतील दळणवळणाला चालना देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते निर्मीती व पुल बांधकाम करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात देखील रस्ते व पुल निर्मीतेचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. आता नव्याने रिसोड तालुक्यातील कोयाळी - नेतन्सा रस्त्यावरील पुल ७.७६ कोटी रुपये, वाशिम तालुक्यातील उकळीपेन - शिरपुटी ब्रम्हा रस्तावरील रस्त्यावरील पुल १.६ कोटी, कारंजा तालुक्यातील माळेगाव -अंबोडा रस्त्यावरील पुल १.४३ कोटी, मानोरा तालुक्यातील वाईगौळ ते गाडेगाव रस्त्यावरील पुल १.६१ कोटी, मानोरा तालुक्यातील इतर दोन पुल १.४६ कोटी. मंगरुळपीर तालुक्यातील आजगाव ते कंझरा रस्त्यावरील पुल २.६२ कोटी, धोत्रा ते बेलखेड रस्त्यावरील पुल ३.२१ कोटी व मालेगाव तालुक्यातील मारसुळ ते राजुरा अनसिंग रस्त्यावरील पुल बांधकाम ३.३८ कोटी रुपयाचे कामे करण्यात येणार आहे, अशी माहीती वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खा. भावनाताई गवळी यांनी दिली. तसेच जे रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झाले आहेत. त्या रस्त्यावर पुलाची आवश्यकता पाहता सदर कामे लवकरच मंजुर करुन घेण्यात येणार असल्याचेही खा. भावनाताई गवळी यांनी सांगीतले.
0 Comments