Ticker

6/recent/ticker-posts

*दुर्गोत्सवाच्या औचित्यावर विजयादशमी दसरानिमित्त महिला पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्याहस्ते शस्त्रपुजा संपन्न.*

 


सद्यस्थितीत जिल्हाभरात नवदुर्गोस्तव उल्हासात साजरा होत असून सदर नवदुर्गोस्तव दरम्यान गरबास्थळी वाशिम पोलीस दलातील निर्भया पथक व विशेष पथकातील महिला अधिकारी/अंमलदार या सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. आज विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपुजन करण्याची प्रथा आहे व त्यापार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील शस्त्र पुजन हे खाकीतील नवदुर्गांच्या हस्ते करून त्यांच्या भरीव योगदानाबद्दल खऱ्या अर्थाने महिला शक्तीचा सन्मान करण्यात आला.


विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी धर्माने-अधर्मावर, सत्याने-असत्यावर विजय मिळविला व त्यामुळे या दिवशी शस्त्र पुजन करण्याचा प्रघात आहे. दरवर्षी पोलीस मुख्यालयात शस्त्रपुजन करण्यात येते. यावर्षीचे शस्त्रपुजन मात्र मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या एका निर्णयाने विशेष ठरले. आपला संसार सांभाळत पोलीस खात्यातील कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदार या खऱ्या शक्तीरूपी खाकीतील नवदुर्गां असून विजयादशमी दसऱ्याच्या शस्त्रपूजनाचा मान महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आला. वाशिम पोलीस दलातील नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम व सर्व पोलीस स्टेशन येथे दि.२४.१०.२०२३ रोजी शस्त्रपुजनाचा कार्यक्रम पार पडला. सदर शस्त्र पुजन हे महिला पोलीस अधिकारी व अंमलदार या खाकीतील नवदुर्गांच्या हस्ते करून त्यांच्या खात्यातील प्रामाणिक कर्तव्याबद्दल सन्मान करण्यात आला.


सदर कार्यक्रम मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, रापोनि.मांगीलाल पवार, पोलीस मुख्यालय, वाशिम, पोउपनि.स्वाती इथापे, AHTU, वाशिम व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सर्व पोलीस स्टेशन स्तरावर प्रभारी अधिकारी व महिला पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या उपस्थितीत महिला पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्याहस्ते पार पडला.



          

Post a Comment

0 Comments