कारंजा लाड तालुक्यातील धनज बु.पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेहा गावात आज दिनांक ३०.१०.२०२३ रोजी मेहा येथील सचिव ग्रामपंचायत गजेंद्र पाखरे यांनी ग्रामसभा आयोजित केली होती याप्रसंगी गावचे पोलीस पाटील शीतलकुमार लक्ष्मणराव कडू पाटील हे प्रामुख्याने हजर होते
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. प्रतिभा प्रमोद बोबडे या होत्या १४० गावातील नागरिकांनी व प्रतिष्ठित व्यक्तींनी या ग्रामसभेला हजेरी लावली होती
ग्रामसभेत प्रामुख्याने मेहा तंटामुक्ती अध्यक्ष विषय ठेवण्यात आला होता
तंटामुक्ती अध्यक्ष या विषयाच्या अनुषंगाने मेहा येथील युवा प्रीतम निचळ पाटील यांचे एकमेव नाव पुढे करण्यात आले
प्रीतम निचळ यांच्या नावास ग्रामसभेने सहमती देऊन त्यांची मेहा येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी ग्रामसभेच्या एकमताने नेमणूक करण्यात आली
प्रीतम मिसळ पाटील यांनी गावातील सलोखा समता बंधुभाव एकजुटीने राहावा याकरिता मी माझ्या वतीने मी प्रयत्न करेल असे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन देऊन या निवळीचे श्रेय त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांना दिले व संपूर्ण गावकऱ्यांचे आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले
0 Comments