"
नेहरू युवा केंद्र व युनिसेफच्या युवा संसदेमध्ये राज्यपालाच्या उपस्थितीमध्ये करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व"
वाशिम प्रतिनिधी ; दी.१३ नोव्हेंबर, नुकत्याच संपन्न झालेल्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद राज्यस्तरीय उपक्रम युवकानं साठी राबविण्यात जात आहे. याकरिता 36 जिल्ह्यातून 72 संसद प्रतिनिधी येणार आहेत. त्यापैकी 24 प्रतिनिधी हे मंत्रिमंडळ कार्य पाहणार असून उर्वरित संसद सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत.यामध्ये ग्रामीण भागातील वाशिम जिल्ह्यातील ग्राम केकतउमरा येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसन असलेले गोरगरीब व तरुण युवकांच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी लढणारे पर्यावरण प्रेमी सर्पमित्र माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (nyks nss) स्वच्छ भारत पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार लाभार्थी प्रदिप पट्टेबहादुर यांची युवा संसद लोकसभेच्या खासदार सदस्य पदी निवड झाली.तर येत्या 19 व 20 नोव्हेंबरला राज्याचे राज्यपाल महोदय रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये व नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र- गोवा राज्य समन्वयक प्रकाश जी मनवरे व युनिसेफ महाराष्ट्र समन्वयक
उपस्थितीमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यातील अभिरूप युवा संसद ही राजधानी मुंबई येथील विद्यापीठ कॅम्पस कलीना कॅम्पस सांताक्लूज येथे संपन्न होणार आहे.२ दिवस चालणाऱ्या या संसदेत विधान भवन राजभवन, व मंत्रालय भेटीसह युवा संसद युवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहे.तर प्रदिप कडूजी पट्टेबहादुर यांची संसद खासदार पदी निवड झाल्याने नेहरू युवा केंद्र वाशिम जिल्हा युवा आधिकरि आशिष पंत व वाशिम यवतमाळ मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी, शिक्षण आमदार अँड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक,जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे,मा. सभापती रेशमाताई गायकवाड, यांच्यासह, आई-वडील नातेवाईक मित्रमंडळी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ, राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण संस्था केकतउमरा यांच्याकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments