Ticker

6/recent/ticker-posts

*संयुक्त राष्ट्राव्दारे प्रतिजैविके ह्या विषयावर आयोजीत जागतीक चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी गोगरी येथील डॉ . संतोष बोथे शेगाव येथील नामांकीत सरस्वती कॉलेज चे प्राचार्य यांची निवड व रोम इटली कडे प्रस्थान*


वार्ताहार शेलुबाजार - 


दि.14/11/2023 संयुक्त राष्ट्र संघ, वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन व एफ ए ओ यांच्या व्दारे "प्रतिजैविकांचा प्रतिरोध" या संपूर्ण जिवसुष्टी करीता धोकादायक ठरु पाहणाऱ्या जागतिक समस्येवर तोडगा काढण्याकरिता आयोजित परिषदेसाठी जगातील 203 देशांमधुन 386 शास्त्रज्ञांची निवड झालेली आहे. भारतामधुन केवळ 2 शास्त्रज्ञांची निवड झालेली असुन त्यामध्ये सरस्वती महाविद्यालय शेगांव चे प्राचार्य व गोगरी गावचे आदर्श डॉ. संतोष बोथे यांचा समावेश आहे. या चर्चासत्रामध्ये डॉ. संतोष बोथे यांच्याकडे नागरी समाज व प्रतिजैविक प्रतिकार वित्तपुरवठा ह्या • अभ्यासगटाचे प्रभारी अधिकारी पदाची जवाबदारी देण्यात आलेली आहे. ह्या परिषदेकरीता डॉ. संतोष बोथे हे दि. 14/11/2023 ला सकाळी रोम करिता नागपूर येथुन प्रस्थान करीत आहेत. हे चर्चासत्र 15 व 16 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित आहे.

प्रतिजैविक प्रतिकार (एएमआर) ही सुक्ष्मजीवांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा उच्चाटनासाठी डिझाईन केलेल्या औषधांच्या उपस्थितीत टिकून राहण्याची किंवा वाढण्याची क्षमता आहे. प्रतिजैविक नावाची ही औषधे जीवाणु, बुरशी, विषाणु आणि प्रोटोझोआ, परजीवी या सारख्या सुक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर उपचार कसायासाठी तारली जातातए.एम. आर. मुळे मानवी जीवांवर, पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या विपरीत परिणामावर ज्यामुळे औषधोपचारांची परिणामकारकता कमी होते यावर उपचार व उपाय योजना यावर सदर परिषदेमध्ये शास्त्रज्ञांव्दारे विचार मंथन होणार आहे.

डॉ. संतोष बोथे यांच्या दोन वर्षाच्या कारकिंदित सरस्वती महाविद्यालयाने सर्वांगिण विकास साधला आहे. त्या साठी त्यांच्या मार्गदर्शनाव्दारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व त्या करिता कोर्सेरा सारख्या अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची सुरूवात, संशोधन, अंतरराष्ट्रीय सहभाग याव्दारे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत त्याचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी भरपूर प्रकारे घेत आहेत व विद्यार्थी अंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगारासाठी पात्र ठरत आहेत. या शुभ प्रसंगी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व गोगरी येथील ग्रामस्थ या सर्वांतर्फे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

Post a Comment

0 Comments