Ticker

6/recent/ticker-posts

*शिवसेना शेतकरी सेना तालुका प्रमुखपदी जिवन महाले*


वाशिम : शिवसेनच्या विविध कक्षा अंतर्गत पदाधिकारी यांच्या नियुक्या सुरु आहेत.गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी जिवन महाले यांची शिवसेनच्या शेतकरी सेना वाशिम तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी खा. भावनाताई गवळी यांनी जिवन महाले यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.


वंदनीय हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांचा हिंदुत्वाचा विचार  आणि धर्मविर आनंद दिघे  यांची शिकवणीमुळे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या विविध कक्षात दाखल होत आहेत. जिवन महाले यांचे शेती व शेतकर्‍यासंदर्भात मोठे कामे आहे. तसेच ते मुख्यमंत्री .एकनाथरावजी शिंदे व शिवसेना नेत्या खा. भावनाताई गवळी यांच्या नेंतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांची शिवसेनच्या शेतकरी सेना वाशिम तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिवन महाले यांना  खा. भावनाताई गवळी यांनी नियुक्ती पत्र प्रदान केले. व त्यांचा सत्कार केला. यावेळी खा भावनाताई गवळी यांनी शेतकरी, शेतमजुर यांच्यासह विविध घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली मदत होईल आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी  आपण सर्वांना सोबत घेऊन समन्वय साधाल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजयभाऊ खानझोडे,  तालुका प्रमुख प्रकाशभाऊ महाले, युवा सेना उप जिल्हा प्रमुख भागवत सावके, युवा तालुका प्रमुख सुमीत गोटे, तालुका सचिव गोपाल गोटे, किशोरभाऊ देशमुख, श्रीधर देशमुख यांच्यासह आदींची उपस्थीती होती.


सोबत फोटो दिला आहे.

Post a Comment

0 Comments