Ticker

6/recent/ticker-posts

*अंधारल्या घरात एक ऊब जाणिवेचीचा प्रकाश दिवाळीत वाटल्या २५१ किराणा किट,कपडे ,फराळ आणि मिठाई*


 कारंजा -

'मदत तुमची छोटी मोठी,हास्य येईल कुणाच्या तरी ओठी' हे ब्रीदवाक्य घेऊन कारंजा मानोरा परिसरात एक ऊब जाणिवेची ही संस्था गेली चार वर्षांपासून समाजातील गरजू व वंचित घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.ज्यांना कोणी आधार नाही,मनोरुग्ण,दिव्यांग, विधवा,परितक्त्या अनाथ अशा व्यक्तींना किराणा किट देण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून एक ऊब जाणिवेची सातत्याने करीत आहे.

              एक ऊब जाणिवेची या संस्थेने 100 कुटुंबही दत्तक घेतले आहेत.त्यांना दर महिन्यांला किराणा व आरोग्य सुविधा पोहचवण्याचे काम प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन केल्या जाते.

या संस्थेमधील जे सदस्य आहेत ते आपले स्वतःचे, मुलांचे, मुलींचे पत्नीचे ,आई वडिलांचे वाढदिवस आनंदाचे क्षण साजरे करताना आपल्या इच्छेप्रमाणे विशिष्ट रक्कम संस्थेच्या खात्यात टाकतात.कोणी  आप्तस्वकीयांचे दुःख बाजूला ठेवून तेरवी व होणारा खर्चही जाणिवेला देतात.देणगीदारांमध्ये व्यापारी, डॉक्टर,इंजिनीयर,पोलिस, शिक्षक,कारागीर,पटवारी, सर्वसामान्य नागरिक,शेतकरी महाराष्ट्रातील अनेक जिह्यांमधून देणगीदार आपल्या देणग्या पाठवीत आहेत.ज्या कुटुंबाना यामध्ये मदत केली जाते ते प्रामुख्याने वाशिम यवतमाळ,अकोला व पालघर जिल्ह्यातील आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातून सातत्याने मदत मिळत असते .गुजरात ओरिसा या राज्यातून मदत येत राहते.शिवाय अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, साऊथ आफ्रिका यासारख्या देशातूनही मदतीचा ओघ वाढत आहे.अनेक देणगीदार हे पैसे आणि धान्य या रुपात आपली मदत करीत आहे.वाशीम जिल्ह्यासोबतच यवतमाळ ,अकोला व पालघर जिल्ह्यातही आपली मदत पोहचवण्याचे काम एक ऊब जाणिवेची करत आहे. नुकतेचं मिशन दिवाळी या उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा कारंजा व मंगरूळपीर सह पालघर,यवतमाळ जिल्ह्यातील कुटुंबांना किराणा कीट कपड़े मिठाईचे वाटप करण्यात आले आहे.या मिशन दिवाळी मुळे अनेक कुटुंबांची दिवाळी ही तेजोमय व आनंदी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments