मंगरूळपीर शहरातील मंगलधामस्थीत तालुक्यात अंगणवाडीचा मोठ्या प्रमाणात कीराणा खाद्य आहार पुरवठा करणा-या शासकीय मालाच्या गोडाऊनला दि. १५ मे रोजी सायंकाळी भिषण आग लागली. ही आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न जनते समोर उभा ठाकला असुन जनतेत अनेक चर्चांना या संदर्भात उधाण आल्याचे ऐकावयास येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरची नळी फाटल्यामुळे सदरची घटना घडल्याचे समजते तर काही महिन्यांपूर्वी मंगरूळपीर आणि मानोरा या दोन्ही तालुक्यातील अंगणवाडी पोषण आहार संदर्भात आहार निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक तक्रारी संबंधित विभागाकडे पुराव्यानिशी करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात चालू सत्रातील काढण्यात आलेले बिले आणि काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स तक्रारदारांकडून मागवण्यात आले होते. होऊ शकते या कारणामुळे, स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्याकरिता संबंधित ठेकेदाराने स्वतःजवळ असलेले रेकॉर्डची ऐशि तैशी करण्या करिता हा अग्नी तांडवाचा खेळ खेळला असावा यात तिळमात्र शंका नाही. म्हणून या दृष्टीने देखील मंगरूळपीर पोलिस तपास करणार आहे का ? याकडे तालुक्यातील सुज्ञ जनतेचे लक्ष लागून आहे. आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रमुख आनंद खीराडे, राहुल शिंगारे, प्रसिद्ध भगत सह तसेच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनची रेस्कयु टीम यांनी अथक प्रयत्न केले तर या ठिकाणी नगरपरिषद चे कर्मचारी व मंगरूळपीर पोलीस उपस्थित होते.
0 Comments