सविस्तर वृत्त असे की कारंजा ते
शेलुबाजार रोडवर तपोवन गावामध्ये बैलाच्या गोठ्याला भीषण आग लागून बैलांचा असलेला चारा जळून खाक झाला आहे. सदर आग ही शॉर्टसर्किट मुळे लागली असा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे रुद्र रूप पाहता गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर आग विजवण्याचा प्रयत्न केला व ही माहिती तात्काळ अग्निशामक विभाग कारंजा यांना देण्यात आली. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब यांनी सुद्धा तात्काळ मंगरूळपीर अग्निशामक दलाला सुद्धा घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यास सांगितले. गोठ्यात बांधलेली गुरे व ढोरे ही गावकऱ्यांनी तात्काळ सोडून इतर ठिकाणी हलविली. त्यामुळे जीवित हानी टळली. पण गोठ्याचे साहित्य व चारा हे खूप प्रमाणात जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यावेळी तपोवन समस्त गावकरी मंडळी कारंजा नगर परिषद अग्निशामक दल व मंगरूळपीर अग्निशामक दल यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहें.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब. सर्व धर्म आपत्कालींचे श्याम भाऊ सवाई व समस्त गावकरी मंडळी तपोवन यांनी तात्काळ आग विजवण्यासाठी मदत केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ ठरला आहे.
0 Comments