Ticker

6/recent/ticker-posts

*गुणी व्यक्तिमत्त्व: संदीप काळे साहेब*



 संदीप काळे हे दैनिक सकाळचे संपादक आहेत. ते मुंबई येथे कार्यरत आहेत. व्हॉईस ऑफ मिडिया या भारतातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. केवळ तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी हे संघटन उभे केले आहे. देशातील पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियासोबत जोडण्याचा झंझावात अजूनही सुरूच आहे. त्यांनी आतापर्यंत 70 पुस्तकं लिहिली आहेत. सोप्प आहे का, वयाच्या चाळीशी पर्यंत एवढं सारं लिखाण करणं…!! अतिशय गाजलेल्या ‘टवेल्थ फेल’ या सुप्रसिद्ध चित्रपटाची स्टोरी त्यांनी लिहिली आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. म्हणजे कथेद्वारे चित्रपटसृष्टीतही त्यांनी पाऊन टाकलेच. दैनिक सकाळने ‘यिन’ या संकल्पनेअंतर्गत युवकांचे फार मोठे संघटन उभे केले आहे, त्याचे ते प्रमुख आहेत.


संदीप काळे हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामात गाजलेल्या पाटनूर गावचे ते भूमिपुत्र आहेत. शेतकरीपुत्र आहेत. ग्रामिण भागातील एक तरुण पत्रकारितेतील उच्चशिक्षण घेऊन संभाजीनगरनंतर मुंबई येथे पत्रकारितेत उज्ज्वल कामगिरी करुन दाखवितो, ही साधी गोष्ट नाही. सकाळचे अभिजित पवार यांच्यासोबत अत्यंत जवळिक निर्माण केलीय, त्यांनी…!  वृत्तपत्राच्या मालकासोबत त्या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे पत्रकारितेपुरतेच संबंध राहतात, पण अभिजित पवार हे संदीप काळे यांच्यासोबत सकाळी साडेचार वाजता अनुलोम-विलोम, ओमकार आणि इतर योगासनं करतात. बरेचवेळा सोबत फिरायला जातात. विविध सकारात्मक विषयावर चर्चा करतात. एवढा अतुट विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. संदीप काळे हे टू व्हिलर, फोर व्हिलर तर चालवितातच, पण त्यांनी विमानही चालविले आहे. त्यांनी उत्तुंग कामगिरी करीत आकाशी झेप घेतली, पण अजूनही जमीनीवर पाय आहेत त्यांचे…!!


धडपडी व्यक्तिमत्त्व काय असते, झपाटल्यागत काम करणं काय असते, हे संदीप काळे सर यांच्याकडे पाहून कळते. हे सर्व मला जवळून अनुभवता आले. मी सकाळ सोडले अन् स्वतंत्र पुस्तक चळवळ सुरू केली. पण, देशोन्नती, सकाळमध्ये संपादकीय विभागात काम केल्याने तो अनुभव स्वस्थ बसू देत नव्हता, म्हणून जनस्वप्नपूर्ती साप्ताहिक सुरू केले. दरम्यान, संदीप काळे यांनी स्थापन केलेली व्हॉईस ऑफ मिडिया सगळीकडे गाजायला लागली. काही पत्रकार संघटना साप्ताहिकाच्या संपादकांना, पत्रकारांना गिणतीतही धरत नाही, हे वास्तव असताना व्हॉईस ऑफ मिडियाने साप्ताहिक पत्रकारांसाठीही लढा उभारण्याचे ठरविले…अन् साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड केली. संघटनेत काम करणं हा माझा आवडता विषय आहे. परिवर्तनवादी संघटनांमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम केल्याचा अनुभव होताच, सांगायचे म्हणजे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून काम केले. अगोदरच स्थिरस्थावर असलेल्या संघटनेत काम करणं वेगळं अन् स्वत: संघटन उभं करणं वेगळं असत…पण साप्ताहिक विंगची प्रदेशाध्यक्ष म्हणून बांधणी करताना संदीप काळे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. म्हणून साप्ताहिक पत्रकारांचे संघटन उभे करता आले. बघता बघता व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंग उभी राहिली. खरंतर, स्वत:चे सकारात्मक संघटन उभे करण्याची क्षमता संदीप काळे सरांमुळे निर्माण झाली. तेवढा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. जशी देशोन्नती व सकाळने स्वत:चे वृत्तपत्र चालविण्याची क्षमता निर्माण केली, अगदी तसेच…!


खरंतर, संदीप काळे सर म्हणजे उंचपुरं, धिप्पाड व्यक्तिमत्त्व. अत्यंत सकारात्मक, तेजस्वी अन् पुढील अनेक वर्षांचं नियोजन करणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. देशातील अनेक नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सर्व क्षेत्रातील मंडळींसोबत त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. लिहिण्यात जसा त्यांचा हात कोणी धरू शकत नाही, अगदी तसेच बोलण्यातही…त्यांचे वक्तृत्त्व अत्यंत प्रभावी आहे. त्यांनी कर्तृत्त्व आणि नेतृत्त्वाच्या जोरावर स्वत:ची सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. काम करण्याची प्रचंड उर्जा त्यांच्यामध्ये आहे. ‘बोले तैसा चाले’ असे हे व्यक्तिमत्त्व आहे.


खरंतर, स्वत:ची पत्रकारिता सांभाळून पत्रकार संघटनेला वेळ देणं, हे खूप अवघड असते,पण तरीदेखिल अनेकजण जीव ओतून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेमध्ये काम करीत आहेत. पत्रकार हा सर्वांच्या समस्या समाजासमोर आणत असतो, पण पत्रकारांच्या समस्या कोणीच मांडत नाही. त्यामुळे पत्रकारांनीच त्यांच्या समस्यांचे निवारण करुन घेण्यासाठी लढा उभारला पाहिजे, हे सत्य आहे. यानुसारच, व्हॉईस ऑफ मिडिया झपाट्याने काम करीत आहे. कारण या संघटनेचे संस्थापक झपाटलेले आहेत. त्यागी आहेत. आणि खूप मोठं काम उभे करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.


पत्रकारांसाठी घर, त्यांच्या पाल्यांचे मोफत शिक्षण, पत्रकारांच्या आजारावर मोफत उपचार, पत्रकारांना निवृत्तीनंतर वेतन आणि सकारात्मक पत्रकारिता केली जावी, हे ध्येय घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया काम करीत आहे. या संघटनेत काम करताना बऱ्याचवेळा स्वत:च्या पत्रकारितेपेक्षाही अधिक वेळ द्यावा लागला आहे. तसा अनेकांनी दिला आहे. म्हणूनच, ही संघटना अल्प कालावधीत नावारुपास आली. पत्रकारिता करणाऱ्यांनी दिवसांतून अर्धा तास तरी व्हॉईस ऑफ मीडियासाठी द्यावा, असे अपेक्षित आहे, आणि अपेक्षेपेक्षाही काहीजण अधिक काम करतात. त्याला कारण व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर आहेत.  


स्वत:मधील उर्जा टिकून राहावी, कोणतेही काम शक्य तेवढ्या लवकर तडीस नेता यावे, स्वत:मधील सकारात्मक गुण जोपासता यावेत, माणसं जोडण्याची शैली टिकून राहावी, आपल्या पत्रकार बांधवांसाठी देखिल काम करता यावे, यासाठी अनेकजण शेवटपर्यंत संदीप काळे सर यांच्यासोबत जुटून राहणार आहेत. व्हॉईस ऑफ मीडियाचे ध्येय पदरात पाडून घेणार आहेत. संघटनेत बदल होत असतात, कार्यकाळ संपत असतो, काहीजण नव्या लोकांना पुढे करत असतात अन् पडद्यामागची तर कधी पडद्यासमोरची भूमिका निभावत असतात. अगदी तसेच माझ्यासह सर्व पदाधिकारी करत राहतील, हा विश्वास आहे.


खरंतर, ‘गुणी व्यक्तिमत्त्व’ या सदरद्वारे मी दररोज एका व्यक्तिबद्दल व्यक्त होत असतो. आज माझी चौथ्या वर्गात प्रवेश करीत असलेली मुलगी हर्षिका म्हणाली की, संदीप काळे सरांबद्ल तुम्ही अजून लिहिले नाही. आणि आज त्यांच्याबद्ल व्यक्त झालो. सांगायचे म्हणजे एक माणूस 70 पुस्तकं लिहितो, पत्रकारांचे सर्वात मोठे संघटन उभे करतो, मोठ्या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करतो, मोठमोठ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावतो, दर आठवड्याचे भ्रमंती नावाचे सदरही लिहितो, पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने लढतो, सातत्याने लेखन आणि वाणी सुरू असते. सारखा प्रवास सुरू असतो, तरिदेखिल हा माणूस थकत नाही. आराम करीत नाही. नकारात्मक विचार करीत नाही. हा माणूस सतत पेटलेला असतो. झपाटलेला असतो. जणू वाऱ्यागत धावत असतो. दररोज नवनवीन माणसं जोडत असतो. नाविण्याचा ध्यास घेत असतो. सतत सकारात्मकतेची कास धरत असतो, हे कसं शक्य आहे, असा विचार माझ्यासारखे अनेकजण करतात. असे कोणते गुण आहेत त्यांच्यामध्ये की ज्यामुळे ते एवढे पॉवरफुल काम करीत आहेत…? तर धैर्य, दूरदृष्टी, प्रचंड मेहनत करण्याची सततची तयारी, आनंदी अन् सकारात्मक वृत्ती, सतत सकारात्मक विचार करणे, सकारात्मकच बोलणे, इतरांचे गुण पारखणे, कामाची डेडलाईन ठरविणे, आणि एखादे मोठे काम फत्ते केल्यानंतर आवडीच्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात जावून निवांत बसणे आणि पुन्हा नव्या उर्जेने कामाला लागणे, यांसारखे अनेकगुण त्यांच्यामध्ये आहेत. ते विचार करतात की महापुरुष अन् क्रांतीकारकांनी केवढा संघर्ष केला असेल, अन् त्यानुसार ते देखिल संघर्ष करण्यास तयार होतात. संदीप काळे हे व्यक्तिमत्त्व समजून घेताना अन् त्यांच्यातील गुण पारखताना निश्चितच खूप मोठी उर्जा निर्माण होते. गुणी व्यक्तिमत्त्व या सदरद्वारे संदीप काळे सर समजून घेऊयात, सगळीकडे सकारात्मकता पोहोचवूया. वन

Post a Comment

0 Comments