वाशीम@१ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमाला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहून महाराष्ट्र दिनाचा अवमान करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी मनसे ने वेळोवेळी जिल्हाधिकारी याना निवेदन देवूनही शून्य कार्यवाही असल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव प्रताप नागरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १९ जुलै २०२४ पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. ५ वा दिवस उलटूनही अद्याप पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात १ मे २०२४ महारष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमाला चक्क अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. सदर प्रकरणी चेतन इंगोले यांनी दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली मात्र चेतन इंगोले यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. न्याय मिळत नसल्याने चेतन इंगोले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा सचिव प्रताप नागरे यांच्याकडे तक्रार दिली असता जिल्हा सचिव प्रताप नागरे यांनी जिल्हाधिकारी याना सदर प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी करत निवेदन दिले.मात्र नागरे यांच्याही निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आल्याने त्यांनी अखेर १९ जुलै २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणाचा ५ वा दिवस उलटूनही कार्यवाही नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केल्या जात आहे.
सदर उपोषणाची दखल भीम टायगर सेनेने घेतली असून भीम टायगर सेनेचे जिल्हाप्रमुख सुमित कांबळे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून जाहीर पाठिंबा दिला आहे.
दोषीवर कडक कार्यवाही करा
१ मे महाराष्ट्र दिनाचा अवमान करणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीच्या मागणीसाठी मनसेचे प्रताप नागरे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन सुध्दा कोणतीही कारवाई झाली नाही .
महाराष्ट्र दिनाचा अवमान करण्याऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभय दिल्या जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी मनसेचे जिल्हा सचिव प्रताप नागरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.त्यांच्या आंदोलनाला भीम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे.
सुमित कांबळे
जिल्हाप्रमुख भीम टायगर सेना वाशीम
0 Comments