कारंजा:- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकिनंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामध्येच कारंजा-मानोरा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.दरम्यान मतदारसंघात आयात उमेदवारांची संख्या जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून अभिजीत राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु काही कारणास्तव अभिजीत राठोड यांची उमेदवारी बाद करण्यात आली त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये नागरिकांमध्ये होऊन युवकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला आहे त्याच माध्यमातून लाखाधिक्य मताने अभिजीत राठोड यांना कारंजा मानोरा विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी नागरिकांनी आणि युवकांनी निवडणूक हाती घेतल्याचे दिसून पडत आहे.त्यामध्येच वंचित बहुजन आघाडी तर्फे अभिजीत राठोड यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांचा विजय मात्र निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे.सध्याच्या स्थितीमध्ये कारंजा मानोरा विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील मतदारसंघातील उमेदवार इच्छुक असून "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना" ही म्हण तंतोतंत खरी होताना दिसत आहे परिणामी नागरिकांमध्ये निराशाजन्य वातावरण आहे आणि "अब की बार स्थानिक आमदार" असा नाराच जणू मतदारांनी लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारंजा-मानोरा मतदारसंघांमध्ये स्थानिक उमेदवार म्हणून एका गरीब व सर्व सामान्य कुटुंबातील, उच्च विदयाविभूषित , युवा तडफदार नेतृत्व म्हणून अभिजीत राठोड प्रत्येकाच्या मनात असून गोर-गरीब, शेतकरी-शेतमजुर,कष्टकरी, बेरोजगार युवकांच्या प्रगतीच्या व मतदासंघांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मतदारांच्या आशा पल्लवित झाल्या असुन सर्व सामान्य जनता येणारी निवडणुक डोक्यावर घेणार असल्याचे चित्र आहे. त्यामूळे इंजी.अभिजीत राठोड यांच्या रूपाने चांगल्या मताधिक्याने विजयाची बाजी मारण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

0 Comments