अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे पाटील
महान:-
तालुका अकोट येथून श्री दत्ताची पालखी महान येथील एकवीस मैल भागातून समोर माहूर कडे जात असताना एका घरातून तिन अल्पवयीन मुलांनी पालखीवर दगडफेक केली, ते तिन्ही मुले मुस्लिम समाजाचे असल्याचे माहिती समोर आली आहे, ही घटना शनिवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सुमारास घडली, घटनेची माहिती मिळताच पिंजर आणि बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी दाखल झाली, उपविभागीय अधिकारी दाभाडे, बार्शीटाकळी चे ठाणेदार शिरीष खंडारे, पिंजर चे ठाणेदार गंगाधर दराडे, व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली, हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, ते तिन्ही अल्पवयीन मुले मुस्लिम समाजाचे असल्याची माहिती समोर आली आहे, यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे , या घटनेमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,
शनिवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता चे सुमारास महान येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामधून जेवण करून ही पालखी माहुर कडे प्रस्थान करणार होती, तेवढ्यात एकवीस मैल भागात पोहोचताच, एका घरातून दगडफेक करण्यात आली, त्यामुळे पालखी मधील सर्व भाविक एकदम गोंधळून गेले, त्या भक्तांना काही कळेनासे झाले, पालखी सोहळ्यातील एकूण पाच महिलांना ते दगड लागले, परंतु महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत, घटनेची माहिती मिळताच महान पोलीस चौकीचे भिकासींग जाधव व कर्मचारी तेथे दाखल झाले, त्यांनी तीन मुलांना ताब्यात घेतले,या तिन मुलांनी आम्हाला पालखीवर दगड मारण्याचे कोणी तरी सांगितले होते,म्हणून आम्ही पालखीवर दगडफेक केली, असे त्या मुलांनी पोलिसांना सांगितले, त्यामुळे पोलिस अजून कसून तपास करीत आहे, यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, त्यातील मुलांचा नेमका काय अंदाज होता, त्यांनी पालखीवर दगडफेक करून पालखीला गालबोट का लावला, याचे संशोधन होणे गरजेचे आहे, घटनेची माहिती मिळतात आमदार हरीश पिंपळे यांनी महान येथे भेट दिली, आणि उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली आहे, यातील मुलांच्या मागे कोणी गॉडफादर असल्याचा संशय आहे, पुंडा येथील श्री दत्त महाराजाच्या पालखीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे,पोलीस या घटनेची छानबीन करीत आहे, या घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांचे मार्गदर्शनाखाली महान पोलीस चौकीचे इन्चार्ज करीत आहेत,
0 Comments