Ticker

6/recent/ticker-posts

*कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांना त्वरित निलंबित करा जिल्हा कंत्राटदार संघटनेचे धरणे आंदोलन*


 वाशिम@सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम येथे नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता शुभम जोशी वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या हुकूमशाही विरोधात जिल्हा कंत्राटदार संघटना आक्रमक झाली आहे.कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांना त्वरित निलंबित करण्याच्या  मागणीसाठी जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज दिनांक २९ ऑगस्ट २०२४  रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

त्याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पाठविण्यात आले आहे.

कार्यकारी अभियंता शुभम जोशी वाशिम येथे  हे रुजु होताच त्यांनी हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला असून कंत्राटदारांना वेठीस घरले आहे.

कंत्राटदार यांना देयक पारित करण्यासाठी कंत्राटदारांना पैशाची मागणी करतात.

ऑनलाईन बिड कॅपिसीटी निवेदेसोबत ऑनलाईन जोडल्यानंतर सुध्दा मनमाणी पध्दतीने आकडेमोड करुन कमी बिड कॅपीसिटी दर्शवुन पात्र निवीदा रद्द करतात.देयके विभागात जमा असुन सध्दा डिमांड करणे शासनाय डिमांड यांना बगल देतात.निधी उपलब्ध नसतांनाही निवीदा काढतात.

मनमर्जी कंत्राटदाराला कामाचे वाटप करतात. शासकीय नियमा नुसार कामाचे ३३.३३.३४. प्रमाणात वाटप करत नाहीत

सार्वजनिक बांधकाम. विभागासाठी शासकीय परिपत्रक नसतांना सुध्दा मुद्रांक शुल्क जिल्हा खनिज प्रतिष्ठान कपात करतात.

वरील बाबीमुळे कंत्राटदारावर अन्याय तथा हक्काची पायमल्ली होत असल्याचा आरोप जिल्हा कांत्रादार संघटनेने केला असून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम  कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष वीरेंद्र देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार जाधव,सचिव विजयबी.जाधव,कोषाध्यक्ष राजकुमार अग्रवाल,सह कोषाध्यक्ष सुभाषराव सरनाईक, माधवराव देशमुख,स्वप्निल सरनाईक, सुधीर जाधव,सुरेश दहात्रे,बाळू मुठाळ,अमोल गायकवाड,संजय डीवरे, आत्माराम चव्हाण,अतुल तूपसांडे आदीसह बहुसंख्य कंत्राटदार सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments