Ticker

6/recent/ticker-posts

*शेंदुरजना येथे विद्यार्थ्यांसह पोलीसांची प्रभातफेरी*



प्रतिनिधी /

प्रमोद आडे / (मनोरा 


शेंदुरजना  अढाव 

- सद्या संपूर्ण देशात 'घर घर तिरंगा, हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत आज शेंदुरजना येथील आप्पास्वामी विद्यालय व ज्युनियर काॕलेज तसेच आप्पास्वामी शिक्षण संस्थेच्या विविध विद्याशाखांच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी आसेगाव पोलीस स्टेशानचे पोलीस उपनिरीक्षक टी.डी.पवार, आर.व्ही. खंदारे, निर्भया पथकाच्या प्रमुख नंदिनी शिंदे यांच्यासह आसेगाव स्टेशनच्या पोलीस बांधवांनी या प्रभातफेरीत भाग घेऊन गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण केले.

      देशात सद्या स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून  याचाच एक भाग म्हणून हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. या उपक्रमा अंतर्गत आज शेंदुरजना येथील आप्पास्वामी विद्यालय व ज्युनियर काॕलेजच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रभातफेरीत आसेगाव पोलीसांनी पोलीस व्हॕनसह हजेरी लावून विद्यार्थ्यांसह प्रभातफेरीत सहभाग घेतला. यावेळी पो.उ.नि. टी.डी. पवार, आर.व्ही. खंदारे, नंदिनी शिंदे यांच्यासह पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        प्रभातफेरी संपन्न झाल्यानंतर आप्पास्वामी शिक्षण संस्थेच्या वतीने आसेगाव येथील पोलीस बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पो.उ.नि. खंदारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जिद्दीने अभ्यास करण्याचे आवाहन केले.

     कार्यक्रमाला प्राचार्य एच. एम. हांडे, उपप्राचार्या एस.डी. सातपुते मॕडम, पर्यवेक्षक के.आर. सरोदे, ज्येष्ठ प्रा. डी.बी. साबळे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रवीण रंगे यांच्यासह संस्थेच्या विविध विद्याशाखेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद शातलवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments