Ticker

6/recent/ticker-posts

*पिंजर येथील वीज कंपनीचे. प्रधान तंत्रज्ञ तन्वीर शेख निलंबित मृत्तक प्रतीक उर्फ अनंत ठाकरे प्रकरण भोवले*

प्रदीप गावंडे जिल्हा प्रतिनिधी 


अकोलातालुक्यातील पिंजर येथील वीज कंपनीचे वरिष्ठ प्रधान तंत्रज्ञ तन्वीर शेख यांना एका प्रकरणांमध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित व्हावे लागले आहे, 

३१ जुलै रोजी शेतात फवारणी करीत असताना प्रतीक उर्फ अनंत ठाकरे वय २२ वर्ष याचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता, या प्रकरणाची वरिष्ठाकडे आणि पोलिसात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली होती, तपास यंत्रणेने केलेल्या अहवालावरून तनवीर शेख यांना  निलंबित व्हावे लागले, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे,



पिंजर येथील युवा शेतकरी  प्रतीक उर्फ अनंत ठाकरे आणि त्याचा भाऊ शेतात फवारणी करीत होते, मृतक हा फवारानिला पाणी आणण्यासाठी विहिरीकडे जात असताना खाली पडलेल्या जिवंत इलेक्ट्रिक तारांचा शॉक २२ वर्षीय तरुणाला लागला होता, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला , मृत्तक शेतकऱ्याने व त्याच्या भावाने यापूर्वी शेतात इलेक्ट्रिक तार पडलेला आहे, म्हणून तोंडी तक्रार केली होती, परंतु विज वितरण कंपनीने दखल घेतली नव्हती, त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पिंजरचे वरिष्ठ प्रधान तंत्रज्ञ तनवीर शेख यांना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे निलंबित केले आहे, निलंबित आदेश यापूर्वी काढला असला तरी ,या प्रकरणाची चर्चा मात्र सध्या परिस्थिती होताना दिसत आहे, याबाबत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गौरक्षणनाथ सपकाळे यांनी शेख निलंबित केल्याची माहिती दिली,

Post a Comment

0 Comments