Ticker

6/recent/ticker-posts

*खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नाने ग्रा.रुग्णालय कामरगाव ला मिळाले दोन वैद्यकीय अधिकारी शिवसेना (उ.बा.ठा) शाखा व सर्कल तर्फे सातत्याने सुरू होता पाठपुरावा*


कामरगाव / प्रतिनिधी कामरगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावाला जोडून ३० ते ४० खेडे आहेत.व कोणत्याही प्राथमिक वैद्यकीय सेवा करीता ग्रामीण रुग्णालय कामरगाव हेच महत्वाचे ठिकाण आहे.त्यामुळे येथे खूप मोठया प्रमाणात रुग्ण येत असतात.परंतु गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना बरोबर उपचार मिळत नव्हते. त्यामुळे ही बाब गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना शाखा व सर्कल कामरगाव च्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रशासनाकडे निवेदनामार्फत मांडली जात होती.तसेच नवनिर्वाचित खासदार माननीय संजय भाऊ देशमुख यांच्याकडे सुद्धा या ग्रामीण रुग्णालयातील असुविधेबद्दलची माहिती देण्यात आली व मा. खासदार साहेबांनी तत्काळ याची दखल घेऊन वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला व आज रोजी या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी, तसेच इ.सी.जी काढण्याची सुविधा माननीय जिल्हा शल्य चिकित्सक वाशीम यांनी उपलब्ध करून दिली.व त्याचे रीतसर प्रशिक्षण स्टाफला देण्यात आले. तसेच ग्रामीन रुग्णालयाची जुनी झालेली इमारत तोडून नवीन ग्रामीन रुग्णालयाची इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होईल.

असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कावरखे सर,वैद्यकिय अधीक्षक डॉ.लहाने सर,नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित घुले,डॉ.वैष्णवी मते, रुग्णालयातील कार्यालयीन स्टाफ,नर्सेस स्टाफ,शिवसेना पदाधिकारी सर्कल प्रमुख शरद तुमसरे,तालुका समन्वयक महेश पाटील बांबल.यावेळी ग्रा.रु. कामरगाव येथे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments