Ticker

6/recent/ticker-posts

*दलित पॅन्थर रा.ना अंभोरे यांचा अमृत महोत्सव निमित्य अनेक मान्यवरांची उपस्थिती आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न*

कारंजा :- दि.4/8/2024 रोज रविवार ला.सच्य काम किया जगमें जिसने!उसणे प्रभू नाम लिया न लिया !!असे हे आंबेडकरी चळवळीतील दलित पॅंथरचे आम जनतेचे सेवक रा.णा.अंभोरे यांचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा(लाड) तालुक्या तील स्थानिक शेतकी भवन कारंजा(लाड)येथे अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.जवळपास 1975 ते 1980 च्या काळामध्ये त्यांनी गावोगावी फिरून ई वर्ग जमिनीच्या वाटपात सहभाग घेतला होता.ज्याप्रमाणे 1964 मध्ये दादासाहेब गायकवाड यांचा जमिनीचा सत्याग्रह होता.तेथून दहा वर्षानंतर रा.ना.अंभोरे यांनी ऐन तरून वयात अनेक संवगडी जमा करून ही चळवळ पुढे उभी केली.बऱ्याचशा गोरगरिबांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला. आजही ती जमीन लोक वाहत आहेत.त्यांचा वाईंडर शिपचा व्यवसाय सांभाळून त्यांनी समाजकार्य करून पत्रकारितेच्या लेखणीतून अनेक गोर गरिबांना न्याय देऊन पत्रकारिता कसी असावी याचे मार्गदर्शन करून अनेक पत्रकार घडवले.वाईंडर शिप करत असताना कधीही पैशासाठी व्यवसाय म्हणून केला नाही.त्यांच्याकडे कधीही वीस पंचवीस लोक बसूनच राहायचे.माणुस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व आहे.अंभोंरे साहेबांचं जगणं लिडर पॅंथरच होतं.लोक कल्याणा साठी त्यांचा जगणं होतं.लोकांना मदत करणे व योग्य सल्ला देणे.हा त्यांचा वाईंडरकीचा दैनंदिन कार्यक्रम होता.गावोगावी पायी प्रवास करून भूमिहीन कुटुंबातील लोकांना ई वर्ग जमीन वाटप करणे.राणा नावाचा एक वादळ होतं.जिथे कुठे अन्याय होईल तिथे पॅंथर प्रमाणे तुटून पडणारे रा ना आंबोरे हे होते.आज त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्या प्रसंगी सर्व समाजातील तळागळातील मंडळी तसेच सेवाभावी मंडळांनी भाग घेतला होता.अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानि लेडी गव्हर्नर कमलताई गवई अमरावती.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष  चरणदास इंगोले वनिता सिद्धार्थ देवरे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद वाशिम जिल्हा काँग्रेस प्रभारी  देवानंद पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भोजराज, जाधव साहेब,शिरसाट साहेब, आंबेडकरी चळवळ ती आजी व माजी अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडु भाऊ इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन सागर अंभोरे यांनी केले. 


Post a Comment

0 Comments