Ticker

6/recent/ticker-posts

*पावसामुळे शेलुबाजार व परिसरातील व्यावसायिक व बँक दुकान घरातील चारी भागातून पाणी घुसून मोठी हानी*

 

मंगरूळपीर तालुक्यातून आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे व गोडाऊनचे  मोठे नुकसान - शेतकरी

शे


लुबाजार :⁠- दि.01.09.24.रोज रविवार रोजी दुपारून संध्याकाळपर्यंत सतत मुसळधार शेलुबाजार परिसरात हाय स्पीड पाण्याची तीव्रता असून मोठ्या प्रमाणात घरातील पाणी घुसून मोठी हानी व तसेच मुख्य चौकात सेंट्रल. स्टेट बँक.तिरुपती प्लायवूड दुकानात व तिरुपती कृषी सेवा केंद्र व अनेक गोडाऊन मध्ये पाणी घुसून नुकसान झाले आणि दुकान व घरात हॉटेल्स कारंजा रोड आणि गुरुदेव नगर अकोला रोड या भागात चक्क पाऊस घरातून नाल्या वाहत गेली. व अनेक भागातून आजच्या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.


लाखोची हानी या पावसामुळे शेलुबाजार परिसरात अति जलद पावसाने मोठे नुकसान झाले असून सर्वांच्या पदरी निराशा आली.


शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान या परिसरात झाले आहे तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून वार्ता कळवण्यात आले की पाण्याची दाट पुढेही शक्यता असल्याकारणामुळे प्रत्येकाने पाण्याची तीव्रता लक्षात घेता जबाबदारी घ्यावी व पाण्यापासून सावधान राहण्याची सूचना ग्रामपंचायत शेलुबाजार च्या वतीने देण्यात आली. 


या पावसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानाची जबाबदारी शासनाने त्वरित घेण्यात यावी आणि शेतकरी वर्गांमध्ये चिंतेची वार्ता पसरली असून याबाबीकडे शेती. व्यवसायिक व घरातील अनेक नुकसानाची हानी झाली असून या बाबीकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन सर्वांचे आसू पुसण्याची वेळ आज आली आहे व सर्वांचे लक्ष शासनाकडे.

Post a Comment

0 Comments