दि 24/5/23 सविस्तर वृत्त असे की नागपूर वरून पुणे जाण्यासाठी निघालेली पर्पल ट्रॅव्हल्स बस समृद्धी महामार्ग लोकेशन 164 जवळ चालत्या ट्रकला मागून धडक दिल्याने 12 जन गंभीर जखमी झाले उर्वीत प्रवासी किरकोळ जखमी झाले रात्रीच्या बाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घडली. अपघाताची माहिती तात्काळ 108 समृद्धी लोकेशन कारंजा डॉक्टर गणेश व पायलट आशिष चव्हाण 108 समृद्धी लोकेशन शेलुबाजार डॉक्टर सचिन आटोळे व पायलट प्रमोद ठाकरे 108 समृद्धी लोकेशन शिवनी व श्री गुरमंदिर रुग्णवाहिका सेवा चे रुग्णक्षेवक रमेश देशमुख हे सर्व रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . व अपघात ग्रस्त रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. तो अपघात एवढा जबरदस्त होता की ट्रॅव्हल्स चा चालक हा टँकर आणि ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये अडकून होता. समृद्धी अग्निशामक दल व 108 पायलट यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. तब्बल अर्धा ते पाऊण तास तो ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये अडकून पडलेला होता. . त्यावेळी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी त्याला काढण्यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रयत्न त्याला काढण्यास यश आले. अपघात झाला तेव्हा ट्रॅव्हल्स मधले सर्व प्रवासी हे शॉक झालेले दिसले होते. अत्यंत विचित्र अपघात झाल्यामुळे ट्रॅव्हल्स मधले काही प्रवासी वरच्या बर्थ वरून खालच्या बर्थ वर पडले. त्यामुळे बऱ्याच रुग्णाचे पाय व हात फॅक्चर झाले होते. त्यावेळी प्रामुख्याने कारंजा शहर सर पोलीस स्टेशनचे पीएसआय वानखडे साहेब पोलीस कॉन्स्टेबल गणेश नागरीकर पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक राऊत व अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनची व्हॅन कारंजा शहर ग्रामीण प्रामुख्याने मदतीसाठी हजर होते. तसेच समृद्धी एम एस सुरक्षा कवच व समृद्धी अग्निशामक दल हे सुद्धा प्रामुख्याने हजर होते. सर्व रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण सर ब्रदर अंकुश धाये कक्ष सेवक सचिन हनवते मास्को सिक्युरिटी गार्ड सागर खंडारे महेश विभूते . श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख समृद्धी रुग्णवाहिकचे श्याम घोडेस्वार अजय घोडेस्वार श्री जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भेलांडे वेदांत रुग्णवाहिकेचे शंकर रामटेके नवनिर्माण रुग्णवाहिकेचे विनोद खोड शुभम खोंड रुग्णसेवक सौरव राजे यावेळी त्यांनी मदत केली. पेशंट ची नावे हर्षल रामदास पाटील वय 41 योगिता गणेश भुते वय 47 कुणाल सुनील भोजने वय 20 अश्विन विलास मोरकर वय 24 मोनाली गाडेकर वय 42 राकेश बुते वय 38 सायली धाडवे व 42 नवनाथ मोहिते वय 42 अभिषेक वानखडे वय 40 मंजू योगेश बुते वय 40 वैष्णवी काळे वय 24 सुमित सावितकर वय 45 रा नागपूर अशी आहे
0 Comments