दि.23 राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान एकाच दिवशी राबविले जाणार आहे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष पद व प्रमुख मार्गदर्शक पदी आमदार बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे बच्चू कडू यांना या समितीच्या अध्यक्षपदासाठी मंत्र्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे 2011 जनगणनेनुसार राज्यातील दिव्यांग यांची संख्या 29 लाख 63 हजार 392 इतकी आहे मात्र दिव्यांगांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ अनेकापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे यामध्ये दिव्यांगांना आवश्यक असणारी कागदपत्रे शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक ती प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी शिबिरे आयोजित केले जाणार आहेत त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगणांना ने आण करण्याची व्यवस्था उभी केली जाणार आहे जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे बंधनकारक करण्यात आले आहे या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यास दोन लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे
0 Comments