शेलु
बाजर गोगरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि त्याच बरोबर गोगरी येथील जय मल्हार मित्रमंडळ व रुग्णसेवा युवा ग्रुप यांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि उन्हाळ्यात होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेत रक्तदान शिबीर आयोजित केले होते,उन्हाचा पारा तीव्र असल्याने रक्तदान शिबीर सकाळीच पार पडले आणी गावातील अनेक युवकांनी शिबीरात सहभागी होत रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिरातील रक्त संकलनसाठी लेडी हार्डिंग अकोला येथील शासकीय रुग्णालयाची टीम बोलावण्यात आली होती जेणेकरून सरकारी रुग्णालयात भरती असलेल्या गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त मिळेल.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी गोगरी गावातील सर्व युवकांनी परिश्रम घेतले सदर रक्तदान शिबिरात प्रमुख उपस्थिती मनून गोगरी गावचे सरपंच केशवराव जटाळे,
, सदस्य नंदू पावशे गावचे नागरिक विनोद जाधव, दीपक अंभोरे, संजय बावणे ,अमोल बोथे, भास्कर साखरे, अमोल टोंचर, विष्णु साखरे, कैलास टोंचर व गावातील जय मल्हार मित्रमंडळचे सर्व सदस्य व रुग्णसेवा युवा ग्रुप चे सदस्य राहुल साखरे, विकास कोंगे, सूरज साखरे उपस्थित होते.
0 Comments