Ticker

6/recent/ticker-posts

*गुटखा माफी यांच्या आवळल्या मुस्क्या सात दिवसात ८४कारवाया*


नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंध घालण्याकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.

     त्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक, वाशिम यांच्या आदेशाने विविध पथकांची स्थापना करून त्याद्वारे गेल्या ०७ दिवसांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या गुटख्याच्या पो.स्टे.वाशिम शहर हद्दीत ०९ कारवाया, पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीत ०५ कारवाया, पो.स्टे.मालेगाव हद्दीत ०७ कारवाया, पो.स्टे.रिसोड हद्दीत ०६ कारवाया, पो.स्टे.शिरपूर हद्दीत ०८ कारवाया, पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीत ०४ कारवाया, पो.स्टे.जऊळका हद्दीत  ०७ कारवाया, पो.स्टे.आसेगाव हद्दीत ०७ कारवाया, पो.स्टे.अनसिंग हद्दीत ०२ कारवाया, पो.स्टे.कारंजा शहर हद्दीत १२ कारवाया, पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीत ०६ कारवाया,  पो.स्टे.धनज हद्दीत ०८ कारवाया पो.स्टे.मानोरा हद्दीत ०३ कारवाया अश्याप्रकारे अवैध गुटखा विक्री संबंधाने आठवडाभरात एकूण ८४ ठिकाणी धडक कारवाई करून १२.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त करत एकूण ८८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सन २०२३ वर्षभरात मध्ये संपूर्ण जिल्ह्यात आजपावतो अवैध गुटखा विक्री संबंधाने एकूण ९७ कारवायांमध्ये १०४ आरोपितांवर अवैध गुटखा विक्री संबंधाने गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून ३९.१५ लाखांचा गुटखा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.

     सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा वाशिम तसेच सर्व पोलीस स्टेशन यांचे पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे. श्री.बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे 

   पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम.

Post a Comment

0 Comments