Ticker

6/recent/ticker-posts

*गोगरी येथील श्रीमती शांताबाई जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित*


महिला व बाल कल्याण विभाग महाराष्ट्र शासन चे वतीने राज्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या दोन महिलांचा सत्कार व गौरव करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले होते, त्या अनुषंगाने ग्रामपंचायत गोगरी चे वतीने सरपंच केशव जटाळे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्रीमती शांताबाई मोतीरामजी जाधव यांना गौरव पत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले गौरव पत्रावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र असून सदर सत्काराच्या वेळी उपसरपंचा सौ.कविता इंगोले,सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ पावसे,भीमराव साखरे,गणपतराव भरकड,रामेश्वर शिंदे,अशोक चव्हाण,संदीप बावणे,मंगेश खंडारे,डीगांबर बोथे,विजय कंकणे,राजेश जाधव, सुरज साखरे,विकास कोंगे,राहुल साखरे,दीपक अंभोरे,पंकज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका,आशा ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments