दि 10/6/23 सविस्तर वृत्त असे की मंगरूळपीर येथील बाहेती सेट यांचा सोयाबीन माल घेऊन सेलू बाजार ते हिंगणघाट जाण्याससाठी निघालेला ट्रकक्रमांक mh 29 be 5852 याला खेर्डा जिरापुरे समोरील गणेश फाट्याजवळ चालत्या ट्रक मध्ये शॉर्टसर्किटमुळे सकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. चालकाच्या लक्षात येताच. त्याने ट्रकला थांबून. कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल यांना तात्काळ माहिती दिली. नेहमी तत्पर असणारा कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल. मुख्याधिकारी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले त्यामध्ये ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला. पण कारंजा नगर परिषद अग्निशामक दल यांच्या प्रयत्नामुळे सोयाबीनच्या लाखोच्या मालाची हानी टळली. त्यावेळी स्वतः बाहेती सेट यांनी कारंजा नगर परिषद अग्निशामक दल त्यांचे आभार मानले.
त्यावेळी नगरपरिषद अग्निशामक दलाचे अधिकारी बातमसाहेब. चालक बाळू काठोये फायरमॅन नरेंद्र भोयर शुभम झोपाटे यांच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळविले. वाशिम विभागांमधून कारंजा अग्निशामक दल हे वेळेवर दाखल होण्यास सगळ्यात अग्रेसर असते हे विशेष आहे
0 Comments