
कारंजा-४जून 2023 स्वर्गीय आकाश ठाकरे यांचे स्मृती प्रित्यर्थ परिवर्तन बहुउद्देशीय संस्था कारंजा लाड जिल्हा वाशिम यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी कामाक्षा माता मंदिर सभागृह पोलीस स्टेशन जवळ येथे करण्यात आले त्याप्रसंगी कारंजा शहरातील युवावर्गांनी आपल्या मित्रा प्रति प्रेम दर्शवत भरपूर मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला यामध्ये वृत्त हाती येईपर्यंत एकूण 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्त संकलन करण्यासाठी शासकीय रक्तपेढी अमरावती यांची सक्रिय टीम या ठिकाणी हजर होती या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अविनाश उकंडे यांनी केले तर याप्रसंगी मिलिंद तायडे अमरावती मंगेश गाढवे अमरावती संगीता गायधने श्री मंगेश उमप श्री प्रवीण कळसकर सर व मंगेश ताथोड कारंजा हे उपस्थित होते. यात परिवर्तन बहुद्देशीय संस्था कारंजा चे अध्यक्ष श्री.पंकज पाटील रोकडे यांनी यावेळी ३० वे रक्तदान केले,भर उन्हाळ्यातही आपल्या कारंजा तालुक्यातील युवा वर्गाने या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत केली त्याबद्दल कामाक्षा देवी संस्थान शासकीय रक्तपेढी अमरावती,तसेच गावातील सर्व रक्तदाते, समाजसेवी संस्था समाजसेवक मंडळी व स्व. आकाश प्रकाश ठाकरे मित्रपरिवार यांचे परिवर्तन बहुउद्देशीय संस्था कारंजाचे अध्यक्ष पंकज रोकडे यांच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष कैवल्य सर्वे यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments