Ticker

6/recent/ticker-posts

*एकतानगरमधील अर्धवट नाल्यांच्या कामास सुरुवात भिमसंग्राम सामाजीक संघटनेच्या लढ्याला यश*


रिसोड - शहरातील एकतानगर येथील अर्धवट नाल्यांचे बांधकाम पुर्ण करुन पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या मागणीसााठी भिमसंग्राम सामाजीक संघटनेने दिलेल्या निवेदनाची नगर परिषदेने दखल घेवून सोमवार, ५ जून रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला असून संघटनेच्या लढ्याला यश मिळाले आहे.

  एकतानगरमध्ये न.प. अंतर्गत नविन सिमेंट रस्ते व नाल्या बांधण्यात आल्या होत्या. मात्र सदर नाल्यांचे बांधकाम अर्धवट झाल्यामुळे या नाल्यात घाण पाणी तुंबले होते. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून परिसरात दुर्गंधी पसरली होती. रहिवाशांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनाचीही पालीकेने दखल घेतली नव्हती. सदर समस्या दुर करण्यासाठी भिमसंग्राम सामाजीक संघटनेचेे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष कपिल वाठोरे यांच्या नेतृत्वात १ जुन रोजी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. संघटनेच्या या निवेदनाची दखल घेवून सोमवार, ५ जून रोजी प्रत्यक्ष नाली उपसण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला असून अभियंता व कर्मचारी वर्गाने कामाची पाहणी केली. त्यामुळे लवकरच एकतानगरमधील रहिवाशांची समस्या दुर होणार असून भिमसंग्रामच्या  लढ्याला यश मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments