वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील विविध भागातील बांधकाम, मजूर यांच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पाच ते दहा किलोमीटर अंतरावर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अंतरराष्ट्रीय जि. प. शाळा साखरा या शाळेत जावे लागते.
हि शाळा साखरा येथे असुन नर्सरी ते आठवी पर्यंत आहे . ग्रामीण भागातील नावरुपला आलेली शाळा राज्यामध्ये प्रसिद्ध असुन वाशिम जिल्हाची शैक्षणिक शान आहे . या शाळेमध्ये जवळपास २० ते २५ गावचे विद्यार्थी शिकत आहेत विद्यार्थी संख्खा जवळपास १००० आहे यामध्ये बहुसंख्ख मुलीचे प्रमाण जास्त असुन येण्या जाण्याकरीता मानव मिशन अंर्तगत महामंडळाची बस सुरु करण्यात यावी. जेणे करुन लेक वाचवा अभियानाअंतर्गत महामंडळाची छेद दिला जाणार नाही व पालकांचे आर्थीक नुकसानही टाळता येईल करिता मा. बस आगार व्यवस्थापक महामंडळ वाशिम यांनी विशेष लक्ष देउन मुलीकरिता हि बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे विनोद महाल्ले यांनी केली आहे .
0 Comments