*{ 73 विद्यार्थ्यांना विद्याश्री शिष्यवृत्ती प्रदान}*
कारंजा दि.10 प्रतिनिधि-
विद्यार्थ्यांनी सुरवातीच्या यशाने हुरळून न जाता, आपल्या पुढील क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून; त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे व आपल्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करावी,असे प्रतिपादन तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी आदिशक्ती संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रमांतर्गत अध्यक्ष स्थानावरून बोलतांना केले.
जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आदिशक्ती महिला बहुऊदेशीय संस्था, वाल्हई या सामाजिक संस्थेचा विद्याश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम दिनांक 9 जुलै रोजी कारंजा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला.
यावेळी अध्यक्षस्थानी तहसीलदार कारंजा कुणाल झाल्टे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण ठाकरे, अभियंता धीरज काटोले, राहुल इंगोले, डॉक्टर मनीष राऊत,स्थापत्य अभियंता अजय राऊत, प्राध्यापक निर्मल ठाकूर, मुख्याध्यापक विजय भड, सौं. मृणाली तोमर उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा हार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. निर्मल ठाकूर यांनी केले, ते म्हणाले की ज्या परिस्थिती मध्ये तुम्ही आहात ती परिस्थिती आम्ही जगलेले आहोत, त्यामुळे कोविड काळात हि हे कार्य थांबले नाही. यासाठी आम्हाला दात्यांचे निरंतर सहकार्य लाभत आहे. यावेळी मान्यवारांनी आपले विचार मांडले. अंनत अडचणींवर मात करून इथपर्यंत पोहोचलो असून आपण सुद्धा पोहचाल याची खात्री बाळगा असे डॉ.ठाकरे म्हणाले. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम असून त्याशिवाय तरणोपाय नाही असे उद्गार गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी काढले. यावेळी एकूण ७३ विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष लागणारे शालेय साहित्य ज्यामध्ये स्कूलबॅग, रजिस्टर, लेखन साहित्य, पाठयपुस्तके यांचा समावेश आहे वाटप करण्यात आले. यावेळेस कोविड काळात सेवाकार्य करतांना बळी पडलेल्या पालकांच्या पाल्याना मदत करून संस्थेने आपली सामाजिक बांधीलकी जपली. तसेच संस्थेची शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी गायत्री मानेकर आणि गजानन ठाकरे यांचा पोस्टात नोकरीला लागल्याबद्दल तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन हेमंत पापडे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल कदम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता विशाल वैद्य,गोपाल खाडे, संतोष नेमाने यांनी परिश्रम घेतले.
0 Comments