Ticker

6/recent/ticker-posts

*श्री. जगबदंबा देवी संस्थान,* *नागरतास येथे दहशतवादी* *हल्ल्याप्रकरणी मालेगाव* *पोलिसांचे प्रात्यक्षीक*


 *मालेगाव  / सुरज अवचार:-* 

राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखुन करावयाच्या कार्यपदधती संबधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन मालेगाव हद्दीतील श्री. जगवदंवा देवी संस्थान नागरतास जि. वाशिम येथे दि. 15/07/2023 रोजी दहशतवादी हल्याची रंगीत तालीम (Mock Drill) चे आयोजन करण्यात आले होते.


त्यानुसार श्री. जगबदंबा देवी संस्थान, नागरतास जि. वाशिम येथे अन्नछत्र चे प्रांगणात व परिसरात दोन संशयोत व्यक्ती खुप वेळे पासून उभे असुन त्यांचे हातामध्ये एक बॉक्स आहे व त्यांचे हालचाली संशयास्पद दिसुन येत असल्याबाबत च ते काही घातपात घडवुन आणन्याचे उद्देशाने तेथे वावरत असलेबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचे फोन आल्याने नियंत्रण कक्षामार्फत पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा व संबंधीत सर्व प्रशासकीय यंत्रणा यांना वेळीच सतर्क करुन सदर घटनास्थळी रवाना करण्याच्या सुचना पोलीस यंत्रणे मार्फतीने देण्यात आल्या.


त्या अनुषंगाने जलद प्रतिसाद पथक यांनी तात्काळ तेथे पोहचुन संबंधीत टिकाणाची तपासणी केली असता श्री. जगबदंवा देवी संस्थान, नागरतास जि. वाशिम येथे अन्नछत्र चे प्रांगणात व परिसरात दोन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल लावलेल्या अवस्थेत दिसुन आले वरुन जलद प्रतिसाद कृतीदल (QRT) यांचे कडुन नमुद व्यक्तींना मोठ्या शिथापीने ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी स्फोटके लपवुन ठेवल्याची जागा दाखविल्याने BDDS व्दारे सदर बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये काही बॉम्ब सदृष्य वस्तु आढळुन आल्याने BDDS तंत्रज्ञानी उपकरणाच्या सहाय्याने सदर बॉम सदृष्य वस्तु निष्क्रीय केली. या दरम्यान फॉरेन्सीक लॅब मार्फतीने घटनास्थळाचे भौतीक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेतलेले वस्तु स्थानिक पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. तसचे ताब्यात घेण्यात आलेले आरोपी पुढील चौकशी कामी स्थानिक पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच ट्राफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली व घटनास्थळावरील झालेला गोंधळ मेगा फोनव्दारे सुचना देवुन नियंत्रणात आनण्यात आले स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडुन जागोजागी नाकाबंदी करण्यात आली. घटनास्थळा वरील दर्शनासाठी आलेले भाविक भक्त व इतर नागरिकांना सुरक्षीतस्थळी पोहचविण्यात आले. व इतर आरोपीचे शोध घेणे कामी वेग-वेगळे तपास पथक तयार करून तपास कामी रवाना करण्यात आले. अशा प्रकारे रंगीत तालीम घेण्यात आली व रंगीत तालीम (Mock Drill) संपल्या नंतर सर्वांना सदर घटना घटते वेळे कोणकोणत्या चुका झाल्या व काय सुधारना करावयास पाहीजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


सदर रंगीत तालीम (Mock Drill) मा. पोलीस अधिक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक, वाशिम / उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम / दहशवाद विरोधी पथक, युनिट अकोला / प्रभारी अधिकारी, स्थागुशा, वाशिम / ठाणेदार मालेगाव / प्रभारी अधिकारी BDDS, वाशिम / प्रभारी अधिकारी, दविशा, वाशिम / प्रभारी अधिकारी, अंगुलीमुद्रा शाखा, वाशिम / जलद प्रतिसाद पथक (QRT) वाशिम / वैद्यकीय अधिकारी मालेगाव रुग्णालय / अग्नीशामक दल मालेगाव यांनी सदर रंगीत तालीम (Mock Drill) मध्ये वरील सर्व प्रभारी अधिकारी, शाखा प्रमुख असे एकुण 9 अधिकारी व 78 पोलीस अंमलदार व इतर विभागांचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला सदर रंगीत तालीम 11.32 ते 13.15 वा. दरम्यान घेण्यात आली कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.


दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे तसेच नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे या बाबत सदर रंगीत तालीम व्दारे दर्शविण्यात आले आहे. तसेच नागरीकांना जागृत राहुन दहशतवादा संबधी काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष वाशिम फोन क्र. 07252234834, डायल 112 वर संर्पक करुन कळवावे असे आवाहान वाशिम जिल्हा पोलीस दलांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments