Ticker

6/recent/ticker-posts

*भाजपा भटके विमुक्त महिला आघाडीच्या वतीने अयोध्यानगर येथे वृक्षारोपण*


वाशिम - भाजपा भटके विमुक्त महिला आघाडीच्या पश्चिम विदर्भ संयोजिका डॉ. जयश्री गुट्टे यांच्या पुढाकारातून शनिवार, १५ जुलै रोजी शहरातील पोस्ट ऑफीस नजीक अयोध्यानगर येथे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

  वृक्षारोपण ही काळाची गरज असून सध्याच्या पावसाळी वातावरणात वृक्ष लावले तर रुजतात व जगतात. ही बाब ध्यानात घेवून अयोध्यानगर येथील दत्त मंदिर परिसरात उंबर, वड, कडूलिंब, बेल, गुलमोहर, सिताफळ, नारळ आदी बहूउपयोगी व औषधीयुृक्त वृक्षांचे रोपटे लावण्यात आले. तसेच या वृक्षांचे जतन, संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. प्रारंभी दत्तमंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसराची साफसफाई करण्यात आली. सदर रोपट्यांना लोखंडी कुंपण लावून त्यांचे संरक्षण करण्याचेही नियोजन यावेळी करण्यात आले. या वृक्षारोपण मोहीमेत डॉ. सौ. जयश्री गुट्टे, जया येळणे, शोभा धवसे, निखिल सदावर्ते, विनोद आदमने, पंकज खंडारे, के.के. काकडे, सचिन राठोड, दत्ता केेंद्रे, दिपक वानखेडे, विठ्ठल राऊत आदींनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments