*मंगरुळपीर / प्रतीनिधी*
मंगरुळपीर तालुक्यातील प्रिपी अवगण येथील रोडवरील स्ट्रिट लाईट व गतीरोधक नाली उंची कमी करणे प्रश्नासंदर्भात गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला साप्ताहिक ग्रामप्रभा च्या वृत्तानंतर जाग आली खरी मात्र रोडवरील स्ट्रीट लाईट नसल्याने कामला सुरूवात करण्यात यश आले आहे . त्यामुळे अजुनही या गावातील स्ट्रीट लाईट व गतीरोधक, नाली उंची कमी करणे, प्रश्न कायम असल्याने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे ,
प्रिंपी अवगण ता मंगरुळपीर येथील गावात स्ट्रीट लाईट व गतीरोधक , नाली उंची कमी करणे ही समस्या निर्माण झाली आहे . या संदर्भात साप्ताहिक ग्रामप्रभा ने वृत्त १७ रोजी मंगळवार रोजी मुख्ख अंकातील पान दोन वर वृत्त प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली होती . या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने येथील गावात आज दुपारी स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी कर्मचारी दाखल झाले होते . एकमेव साप्ताहिक ग्रामप्रभा ने येथील गावाचा दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते . आज स्ट्रीट लाईट बसवल्याने महिलासह , ग्रामस्थामध्ये आनंद झाला होता .
0 Comments