Ticker

6/recent/ticker-posts

*स्वर्गीय प्रकाश दादा डाहाके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न*


भव्य रोगनिदान शिबिर

भव्य रक्तदान शिबिर 

वृक्षारोपण व अभंग वाणी

 उपजिल्हा रुग्णालय फळ वाटप 

  दि 19/8/23 सविस्तर वृत्त  असे की स्वर्गीय प्रकाश दादा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम दादाच्या प्रतिमेला आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम सकाळी 9:30 मिनिटांनी स्वर्गीय प्रकाश डहाके वन पर्यटन केंद्र   कारंजा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी श्रीमती सई ताई डहाके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी  दादाच्या कार्याला उजळा देण्यात आला. जे आज हे भव्य असा बहरलेला वन पर्यटन केंद्र आहे ते दादाच्या प्रयत्न मुळे  झालेला आहे. त्यावेळी वन विभागातील कर्मचारी व निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे फळ वाटप  करण्यात आले.त्यानंतर. भव्य स्त्री रोग शिबिराचे उद्घाटन श्रीमती सईताई  प्रकाश डहाके युवा नेते देवव्रत  डहाके श्री दत्ताभाऊ डहाके कौस्तुभ डहाके  प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी स्त्री रोग तज्ञ. डॉक्टर सोनाली राऊत मॅडम डॉक्टर दिपाली काटोले मॅडम डॉक्टर आडे मॅडम डॉक्टर जवाहरमलानी मॅडम डॉक्टर उपाध्ये मॅडम  या सर्व डॉक्टरांनी स्त्री रोग तपासणी केली व जवळपास तीनशे ते साडेतीनशे महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीमती सईताई डहाके  दत्ताभाऊ डहाके  उपसभापती कृषी उत्पन्न समिती दिनेश भाऊ राठोड राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष युसुफ शेठ पुंजाणी युवा नेते देवव्रत  डहाके कौस्तुभ डहाके  जय किसन भाऊ राठोड  यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून 72 रक्तदान त्यावेळी रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता डॉ अविष दरेकर आशिष गावंडे  ऋषिकेश भारती  अजय डोंगरदिवे  श्रीकांत गावंडे  विकी पाटील चौधरी अमोल भाऊ अघम ओम पाटील चव्हाण  रमेश देशमुख यांनी त्यावेळी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments