Ticker

6/recent/ticker-posts

*तहसिलदार तेजनकर यांची पाचांबा येथे रास्त भाव दुकानाला भेट*


 वाशीम - रिसोड तालुक्यातील ग्राम पाचांबा येथील भिमसंग्राम बहूउद्देशिय संस्था व्दारा संचालीत रास्त भाव दुकानाला रिसोडच्या तहसिलदार कु. प्रतिक्षा तेजनकर यांची शनिवार, २६ ऑगष्ट रोजी भेट दिली. यावेळी संस्था अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारी समाधान जावळे, भिमसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेजर कपिल वाठोरे, प्रा. संजय इंगळे, स्वप्नील जमधाडे, प्रशांत हिवाळे आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसिलदार तेजनकर यांनी रास्त भाव दुकानाची पाहणी केली, तसेच दुकानातील धान्य वाटप रजिस्टर, धान्याचे नमुने, ई-पॉस मशीन, मोबाईल सिडींग, आधार सिडींग, वाटप अहवाल. पोर्टबिलीटी यासह दर्शनी फलकाची पाहणी केली. रास्त भाव दुकानातील कामकाज व इतर बाबी पाहून त्यांनी नोंदपुस्तिकेत समाधानकारक असा शेरा दिला. प्रत्येक लाभार्थ्याला शासनाचे निर्देश आणि नियमानुसार धान्य वाटप करण्याचे निर्देश यावेळी तहसिलदार तेजनकर यांनी दिले.

Post a Comment

0 Comments