महापुरुषांच्या विचारधारेवर चालून पक्षाला बळकटी देण्याची ग्वाही
वाशीम - येथील भिमसंग्राम सामाजीक संघटनेचे अध्यक्ष व भारत संग्राम वृत्तपत्राचे संपादक डॉ. माधव हिवाळे यांनी १ ऑगष्ट रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या वंचित बहूजन आघाडीच्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला.
मंचावर वंचितच्या महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरुंधतीताई शिरसाट, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे, जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, बाळुभाऊ खंडारे, जेष्ठ नेते किसन साळुंखे, उपाध्यक्ष नितीन बनसोड, अजय सरकटे, गजानन सरकटे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. माधव हिवाळे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वंचित बहूजन आघाडीत जाहीररित्या प्रवेश घेतला. डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या हस्ते डॉ. हिवाळे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. महापुरुषांची प्रेरणा व श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालून जिल्ह्यात पक्षसंगठन मजबूत करण्यावर भर देवू अशी ग्वाही डॉ. हिवाळे यांनी यावेळी दिली.
0 Comments