Ticker

6/recent/ticker-posts

*महायुतीच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या समोर खुर्चीवरून वादंग व्यासपीठावरून नाराजी नाट्य*


वाशीम  : आज वाशीम शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य व यवतमाळ वाशीम लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे भाषण करण्यासाठी गेले असता त्यांच्या खुर्चीवर स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र गायक पाटणी बसले. मात्र राजू पाटील राजे भाषण आटोपून आले असता गायक पाटणी यांनी खुर्ची न दिल्याने काही काळ एकच गोंधळ उडाला होता.  एकीकडे भाजप शिस्त आणि अनुशासनाचा डंका पिटताना दुसरीकडे स्थानिक स्तरावर भाजप मधील नेत्यांच्या मुलांची दादागिरी तर प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिसऱ्या रांगेत स्थान मिळत असल्यामुळे नाराजी नाट्य उफाळून येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाची निवडणूक लागल्याने आज वाशीम शहरातील पाटणी कॉम्पलेक्स येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या समर्थनार्थ महायुती चा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर निष्ठावंत शेवटच्या रांगेत तर स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र ग्यायक पाटणी हे समोरील रांगेत बसले होते. यावेळी नेत्यांनी आप आपले विचार व्यक्त केले. भाजप चे प्रदेश सदस्य तथा यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघांचे समन्वयक राजू पाटील राजे भाषण करण्यासाठी गेले त्यावेळी गायक पाटणी त्यांच्या खुर्चीवर बसले होते. राजू पाटील राजे आपले भाषण आटोपून खुर्चीवर बसण्यासाठी गेले असता गायक पाटणी यांनी खुर्चीवरून उठवण्यास नकार दिल्याने काही काळ  गोंधळ उडाला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, अर्जुन खोतकर, राजश्री पाटील महाले यांची उपस्थिती होती. अखेर राजू पाटील राजे यांना दुसरीकडे बसावे लागले तर गायक पाटणी मात्र त्याच खुर्चीवर बसून होते. एकीकडे भाजप घराणेशाही विरोधात गळा फोडून बोलते. शिस्त आणि अनुशासन शिकविते. मात्र आज महायुतीच्या मेळाव्यात स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मुलाचे स्थान काय ? त्यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्याचे कारण काय ? भाजप मधील अनेक ज्येष्ठ नेते मागे तर आमदार पुत्र सर्वात समोर कसे ? असा प्रश्न उपस्थित होत असून संभाव्य उमेदवार उपस्थित असताना मेळाव्यात खुर्चीसाठी भांडणे जनतेने डोळ्यासमोर पहिल्याने वेग वेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Post a Comment

0 Comments