मानोरा :- पोहरादेवी येथील बाजार मंडीमध्ये १४ एप्रिल पासून बकरा विक्री करीता गेलो असता रामनवमी यात्रा महोत्सव दिनी सकाळी अंदाजे ९ वाजता ठाणेदार प्रविण शिंदे येऊन त्यांनी बांधलेल्या बकऱ्या सोडल्या याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी हातातील काठीने मारहाण करून जास्तीच्या बकऱ्या विक्रीसाठी का आणल्या असे म्हणून शिवीगाळ करत पायावर, मांड्यावर काठीने मारहाण केली. या मारहाणीत माझ्या उजव्या हाताचे बोटाला जबर मार बसला तसेच दोन्ही पायाच्या पोटरीवर तसेच मांडीवर सुजन येवून वळ उमटले आहे.त्यामुळे दोषीवर कारवाई करून न्याय द्यावा, असे निवेदन पोलीस अधिक्षक यांना १९ एप्रिल रोजी पिडीत केशव श्रीराम डोईफोडे रा. पिंपळगाव चांभारे यांनी दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मी खाटीक असून पोहरादेवी येथे बकऱ्या विक्री करण्यासाठी गेलो होतो. रामनवमी दिनी ठाणेदार प्रविण शिंदे हे पोलीस गणवेशात बाजार मंडीत आले. त्यावेळी मी, बकऱ्याजवळ बसलो होतो. ते बांधलेल्या बकऱ्या सोडत असतांना मी त्यांना बकऱ्या का सोडत आहे, असे हटकले. तसेच बकऱ्या सोडून दिल्या तर पळून जातील व ते भेटणार नाही. असे सांगितले असता काहीही विचार न करता त्यांनी हातातील काठीने मारहाण करत शिवीगाळ करत बकऱ्या विकण्यासाठी का आणल्या म्हणून पायावर, मांड्यावर काठीने मारहाण केली. ठाणेदाराच्या मारहाणीत मी बेशुद्ध पडल्यावर तेथील काहीं लोकांनी मला दवाखान्यात नेले. दवाखाना झाल्यावर बकऱ्याच्या ठिकाणी आलो असता सहा बकऱ्या गायब झाल्या होत्या. पुन्हा मी ठाणेदार शिंदे यांच्याकडे जाऊन सहा बकऱ्या गायब झाल्याचे सांगत पोलीस चौकीवर तक्रार देण्यास गेलो असता असता तेंव्हा त्यांनी जीवाने मारल्याशिवाय राहणार असे सांगून पुन्हा मारहाण केली. तक्रार घेवू नये, असे पोलिसांना सांगितले. याबाबत न्याय द्यावा अशी मागणी सदर युवकानी पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
0 Comments