Ticker

6/recent/ticker-posts

*महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना मतदारांचा 'नो रिस्पॉन्स'*


 वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राजश्री पाटील या हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. यवतमाळ जिल्ह्याशी त्यांचे जुने नाते असल्याचे या मतदारसंघात बोलले जात असले तरी मात्र त्यांना निवडणुकीत फारसे कोणी जवळ करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारार्थ आजपावेतो झालेल्या सभा, रोड शो यांनाही अत्यल्प प्रतिसाद मिळत असून मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या सभोवताली असलेल्या गोतावळ्याने मात्र त्यांना ही वस्तुस्थिती व मतदारांमध्ये असलेल्या चचर्चा न सांगता आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ अश्या फुग्यात त्यांना बसवून ठेवले असल्याचे खुद्द महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते चर्चा करीत आहे. परिणामी सामान्य कार्यकर्ते हे त्यांच्या प्रचारापासून अलिप्त राहण्यात आपले समाधान मानत असल्याचे बोलले जात आहे. वाशिम यवतमाळ - लोकसभा मतदारसंघाच्याउमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचे नेते अभिनेते, मुख्यमंत्री ना. शिंदे खुद्द वाशिम जिल्ह्यात आले असले तरी मात्र त्यांच्या नावावर मतदारसंघात कमालीची नाराजी पसरली आहे. त्यातच महायुतिच्या विविध सभा, प्रचार रॅली यामध्ये घटक पक्षाच्या नेत्यांना मिळणारी सावत्र वागणूक यामुळे घटक पक्षातल नेत्यांनी सुद्धा राजश्री पाटील यांच्या नावावर चक्क 'फुली' मारली असल्याची माहितीविश्वासवनिय सूत्रांकडून प्राप्तआहेएकंदरीत नियोजनशून्य कारभारामुळे राजश्री पाटील यांना वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात मतदारांचा 'नो रिस्पॉन्स' असल्याचे दिसून येत आहे. परिणामी या मतदारसंघात सेनेला उतरती कळा लागली असून आपला बालेकिल्ला गमवावा लागणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments