Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्यधामच्या पाचही संचालकावर फसवणुकीचा गुन्ह्यात न्यायालयाने घेतली दखल* *राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव यांचाही समावेश*

 प्रतिनिधी विशाल मोरे 


मानोरा :- तालुक्यातील जनतेला आरोग्यसेवेकरिता दिग्रसच्या आरोग्यधाम हॉस्पिटल यावर अवलंबून राहावे लागते. त्यातही या दवाखान्यात लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी जनतेकडून वारंवार येत राहतात. परंतु कोरोना काळात जनतेची लूट केल्याबाबत पुंडलिक गोविंदराव गावंडे यांनी दिग्रस येथिल प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी यांचे न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करुन भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १२०, ४१७,४२०, ४६७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलम ५१ ख नुसार गुन्हा नोंद होऊन तपास होण्यासाठी विनंती केली होती. त्या अनुषंगाने न्या. बी. एस. जगदाळे यांनी दिनांक ७ जून रोजी फौजदारी प्रकिया संहितेच्या कलम २०४ अन्वये प्रथम दर्शनी पुराव्याच्या आधारावर भारतीय दंड संहिता मधील कलम ४१७, ४२० आणि ४६८ अन्वये आदेशिका काढली आहे.

     या आरोग्यधाम हॉस्पिटल चे संचालक यांना आरोपी म्हणुन डॉ. संदीप दुधे, डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ.श्याम जाधव आणि डॉ. श्रीकृष्ण पाटील यांचे विरोधात आदेशिका काढल्याने या प्रकरणी पुढे काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण यवतमाळ जिल्हासह वाशिम जिल्ह्याचेही लक्ष लागलेले आहे.

 हॉस्पिटल असो अथवा वैद्यकीय चिकित्सक विद्यमान काळात डॉक्टर हे रुग्णांना जीवन देणारे भगवान समजले जातात.

 मात्र हल्ली रुग्णसेवा हि सेवा राहिली नसून कमाईचे साधन झालेले असल्याचे पदोपदी अनुभव यायला लागलेले आहे. कोरोना महामारीच्या त्रासदीमध्ये अनेक कुटुंबीय आपल्या जिवलगांपासून कायमचे दुरावले गेले. ह्या जागतिक आपत्तीच्या काळात सुद्धा अनेक हॉस्पिटलमध्ये मानवता जपली गेली नाही याचे अनेक उदाहरणे असून आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये सुद्धा असे लुबाडणूकीचे प्रकरण घडलेच नसावे हे कशावरून असे सध्या न्यायालयाने ह्या हॉस्पिटलच्या डॉक्टर असलेल्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशावरून समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments